नागपूर येथील पेंच व्याघ्र प्रकल्पात कर्नाटक राज्यातून चार हत्ती येणार आहेत. सप्टेंबर महिन्यात चार हत्तींचे पेंच व्याघ्र प्रकल्पात आगमन होईल. त्यापैकी तीन हत्ती आणण्याबाबत नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी परवानगी दिली आहे.
मानव वन्यजीव संघर्षवर नियंत्रण आणणे, वाघांचा मागोवा घेणे, बचाव मोहीम राबवणे तसेच गस्त घालण्यासाठी चार हत्ती पेंच व्याघ्र प्रकल्पात आणले जातील. पेंच व्याघ्र प्रकल्पातील मनाधिकाऱ्यांची टीम लवकरच कर्नाटकात हत्तींना आणण्यासाठी जाणार आहे. वनविभागाच्या वन्यजीव विभागाचे पश्चिम क्षेत्र अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉक्टर क्लेमेंट बेन या मोहिमेचे नेतृत्व करतील. बेन यांच्या नेतृत्वाखाली पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉक्टर प्रभुनाथ शुक्ला, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुजित कोलंगट,पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या चोर बाहुली वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे या अधिकाऱ्यांचा मोहिमेत समावेश करण्यात आला आहे.
(हेही वाचा- Global AI Conference : भारतात होणार पहिली ‘ग्लोबल इंडिया एआय 2023’ परिषद)
हत्तींच्या मागण्यासाठी कर्नाटकातील मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्याशी डॉक्टर बेन आणि डॉक्टर शुक्ला यांनी चर्चा केली होती. दोघांनीही काही महिन्यांपूर्वी दुबरे आणि मोठीगोंडू हत्तीच्या छावण्याला भेट दिली. डॉक्टर बेन यांनी तीन हत्तींची निवड केली. या तीन हत्तींना आणण्यासाठी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनीही परवानगी दिली.
हत्तींच्या आगमनासाठी आवश्यक तयारीसाठी वनाधिकारी कामाला लागले आहेत. बंगळूरु ते नागपूर प्रवास रस्ते मार्गाने पूर्ण केला जाईल. हत्तींसाठी ट्रकची व्यवस्था करणे, इतर आवश्यक साधनसामग्रीची तयारी केली जात आहे. कर्नाटकातील हत्ती बचाव कार्यासाठी प्रशिक्षित आहे. 21 ते 35 वयोगटातील हत्तींचा वापर नागपूर येथील संघर्ष परिस्थिती हाताळण्यासाठी केला जाईल, अशी माहिती डॉक्टर शुक्ला यांनी दिली.
Join Our WhatsApp Community