विदर्भाला नैऋत्य मोसमी पावसाची प्रतीक्षा

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर नैऋत्य मोसमी वारे जळगाव आणि नंदूरबारमध्ये दाखल झाले आहेत. मराठवाड्यातही नैऋत्य मोसमी वा-यांनी प्रवेश केला. मात्र विदर्भ गाठायला नैऋत्य मोसमी वा-यांना दोन ते तीन दिवस लागतील, असा नवा अंदाज वेधशाळेने जाहीर केला आहे.

( हेही वाचा : आता कितीही वेळा देता येईल MPSC परीक्षा!)

पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता 

सध्या राज्यभरात पाऊस सक्रिय असला तरीही विदर्भात पुरेसा पाऊस न झाल्याने विदर्भवासीयांना केवळ पूर्वमोसमी पावसातच समाधान मानावे लागत आहे. शुक्रवारपासून तीन दिवस संपूर्ण कोकणात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. तीन दिवस कोकणात पावसाची संततधार राहील. दक्षिण कोकणात वीकेण्डला मुसळधार पाऊस राहील. मात्र राज्याच्या इतर भागांत पावसाचा फारसा जोर राहणार नाही. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. विदर्भात ही स्थिती १९ जूनपर्यंत राहील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here