हिंदू राष्ट्रवादी असलेले Arun Shourie झाले हिंदू विरोधक

183

एक काळ होता जेव्हा डाव्या पत्रकारांचा सगळीकडेच बोलबाला होता. अशा काळात Arun Shourie हे हिंदू राष्ट्रवादी विचारांचे समर्थक म्हणून पुढे आले. त्यांचा जन्म २ नोव्हेंबर १९४१ रोजी जालंधर येथे झाला. Syracuse University मधून त्यांनी अर्थशास्त्रात पीएचडी डिग्री मिळवली. १९६७ मध्ये त्यांनी विश्व बॅंकेत १० पेक्षा अधिक वर्षे अर्थतज्ज्ञ म्हणून काम पाहिले. तसेच १९७२ – ७४ दरम्यान ते भारतीय योजना आयोगाच्या सल्लागार पदावर विराजमान झाले. याच काळात त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या आर्थिक नीतीवर टीका करणारे लेख लिहिले आणि एक हिंदू राष्ट्रवादी पत्रकार म्हणून ते समोर आले.

आणीबाणीच्या काळात तर त्यांच्या लेखणीला भलतीच धार आली होती. इंडियन एक्स्प्रेसमध्ये त्यांनी इंदिरा गांधींच्या या धोरणाला स्पष्ट विरोध करणारे लेख लिहिले. रामनाथ गोएंका यांनी शौरींना १९७९ मध्ये कार्यकारी संपादक या पदावर नियुक्त केले आणि त्यांना लेखणी तलवारीप्रमाणे चालवण्याची मुभा दिली. त्यांनी अनेक नेत्यांचे भ्रष्टाचार उघडकीस आणले. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अंतुले यांच्या विरोधात तर Arun Shourie यांनी आंदोलनच पुकारले होते. त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. अरुण शौरी एक अत्यंत कुशल व निडर लेखक म्हणून उदयाला आले. इंदिरा गांधींच्या दहशतीची पर्वा न करता त्यांनी शरसंधान सुरुच ठेवले. मात्र सरकारने सतत दबाव टाकल्यामुळे त्यांना गोएंका यांनी कामावरुन काढून टाकले.

(हेही वाचा Maratha Reservation : हिंसक आंदोलकांवर उगारला कायद्याचा बडगा; पोलीस महासंचालकांनी दिली माहिती)

Arun Shourie यांच्या लेखन कार्यासाठी १९८२ मध्ये त्यांना रेमन मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना १९९० मध्ये पद्मभूषण पुरस्कार देखील मिळाला आहे. अरुण शौरींनी मुस्लिम महिलांच्या बाबतीत तलाक या प्रश्नावर देखील चिंता व्यक्त केली होती. १९९० मध्ये भाजपा सरकार आल्यावर अरुण शौरी राष्ट्रवादी विचारांचे जणू आवाज झाले होते. त्या काळी डाव्या पत्रकारांची दहशत होती हे विसरुन चालणार नाही. Hindu Temples – What Happened to Them यांसारख्या पुस्तकातून त्यांनी प्रखर हिंदू विचार मांडले. इस्लाम आणि ख्रिस्ती पंथाचे विश्लेषण केले. त्या काळात हे कठीण आणि धाडसाचे काम होते.

मात्र आता Arun Shourie हे नरेंद्र मोदींचे कट्टर विरोधक मानले जातात. वाजपेयी सरकारसोबत काम केलेले शौरी आज भाजपाचेच विरोधक झाले आहेत. राफेल खरेदीवर देखील त्यांनी प्रचंड टीका केली. एक अत्यंत बुद्धीवान माणूस कोणतेही पुरावे नसताना राफेलवरुन मोदींना घेरण्याचा प्रयत्न करतो हे दुःखास्पद आहे. सर्वाैच्च न्यायालयानेही याबाबत क्लीन चीट दिलेली असताना शौरी तोच पाढा गिरवत राहिले. खरे पाहता अरुण शौरी यांचे बौद्धिक अधःपतन झाले आहे. एकेकाळी हिंदू राष्ट्रवादी असलेला हा विद्वान आज स्युडो सेक्युलर गटात शिरला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.