क्रुझ ड्रग्ज प्रकरण: आर्यन खान प्रकरणात ‘एनसीबी’ला न्यायालयाचा मोठा दिलासा!

94

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ला मोठा दिलासा देत, बॉलीवूडमधील चर्चित आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मुंबई न्यायालयाने आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी 60 दिवसांची मुदत दिली आहे. यापूर्वी २ एप्रिल रोजी आरोपपत्र दाखल करण्यात येणार होते. आर्यन खानवर ड्रग्ज घेण्यासह इतर अनेक आरोप आहेत.

म्हणून मुदतवाढीची मागणी

यापूर्वी सोमवारी, एनसीबीने आर्यन खानशी संबंधित कथित क्रूझ प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांचा अतिरिक्त वेळ मागणारा अर्ज मुंबईतील सत्र न्यायालयात दाखल केला होता. त्यावर सुनावणी करताना विशेष न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांनी निर्णय राखून ठेवला होता. या हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असल्याचा युक्तिवाद एनसीबीने न्यायालयात केला होता. त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती.

याप्रकरणी 20 जणांना अटक करण्यात आली 

2 ऑक्टोबर 2021 रोजी गुन्हा नोंदवत याप्रकरणी 20 लोकांना अटक करण्यात आली होती. यातील 18 आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. एनसीबीकडे या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी 180 दिवसांचा कालावधी होता, जो 2 एप्रिल 2022 रोजी संपणार आहे.

( हेही वाचा: महागाईची झळ! एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ )

आर्यन सध्या  जामिनावर बाहेर

2 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय बंदर टर्मिनलवरून क्रुझ गोव्यासाठी रवाना झाली. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेतल्यानंतर आणि त्यानंतर अटक केल्यानंतर, एनसीबीने ड्रग्ज तस्करीच्या कटाचा भाग असलेल्या एकमेकांच्या संगनमताने अनेकांना अटक केली. 28 ऑक्टोबर 2021 रोजी आर्यन खानला जामीन मिळाला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.