सध्या कुठलीही माहिती सर्च करण्यासाठी आपल्याला गुगल बाबांची चांगलीच मदत होते. गुगलवर कुठलीही माहिती सर्च करत असताना त्यासंबंधित असंख्य सर्च सजेशन्स आपल्याला सर्च ऑप्शन्समध्ये दिसतात. पण गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स प्रकरणात चर्चेत असणा-या आर्यन खानचं नाव गुगलवर सर्च केल्यास त्याच्यासाठी एकही सर्च सजेशन दिसत नसल्याचे समजत आहे.
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अंमली पदार्थ संबंधीच्या आरोपावरुन सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. या हाय प्रोफाईल केसमध्ये आता राजकीय पक्षांनी सुद्धा उडी घेतल्याचं दिसून येत आहे.
(हेही वाचाः आता आर्यन खानसाठी शिवसेनेची न्यायालयात धाव)
काय होत आहे नेमके?
गुगलवर कुठल्याही प्रसिद्ध व्यक्तीचं नाव सर्च केल्यास त्याची जन्मतारीख, वय, इन्स्टा प्रोफाईल, फोटो, अपडेट, लुक, लाईफ असे अनेक सर्च सजेशन्स आपल्याला दिसतात. मात्र, आर्यनच्या बाबतीत मात्र असे कुठलेही सजेशन दिसत नसून ब्लँक स्क्रीन दिसत आहे. त्यामुळे गुगल आणि शाहरुखची प्रसिद्धी टीम यांच्यावर संशय घेतला जात आहे.
(हेही वाचाः “मी चांगला माणूस बनवून दाखवेन…” आर्यन खानने दिला शब्द)
आर्यनची माहिती केली जातेय मॅनेज?
गुगल ट्रेंड्स मध्ये आर्यनच्या केस संबंधीची माहिती म्हणजेच बेल, लेटेस्ट अपडेट, आर्यनसंबंधीच्या बातम्या सर्च होत आहेत. कोणताही की-वर्ड दिला तरी गुगल सर्चमध्ये आर्यनबाबत एकही की-वर्ड दिसत नाही. त्यामुळे आर्यनची गुगल किंवा शाहरुखची प्रसिद्धी टीम मॅनेज करतेय का, अशा चर्चांना उधाण आले आहे.
Join Our WhatsApp Community