आर्यनचे ‘खान’पान कोठडीतच… जामीन अर्ज फेटाळला

त्यामुळे आर्यन खानच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

157

गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खान आणि त्याच्या मित्रांची ड्रग्स प्रकरणी 20 ऑक्टोबर रोजी सुनावणी पार पडली. या सुनावणी मध्ये आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा यांचा अर्ज विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आर्यन खानच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

(हेही वाचाः “मी चांगला माणूस बनवून दाखवेन…” आर्यन खानने दिला शब्द)

एनसीबीची मोठी कारवाई

आर्यन खान आणि त्याच्या काही सहका-यांना कॉर्डिलिया क्रूझवर कारवाई करत एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले होते. मुंबईहून गोव्याला जाणा-या कॉर्डिलिया क्रूझवर मोठ्या प्रमाणात ड्रग्स असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार एनसीबीने कारवाई करत छापा मारला होता. त्यावेळी सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 8 जणांना एनसीबीने ताब्यात घेतले होते. गेल्या 17 दिवसांपासून आर्यन खान कोठडीत असून, सध्या तो आर्थर रोड तुरुंगात आहे.

(हेही वाचाः आर्यन खानचे सर्च सजेशन गुगलवरुन झाले ‘गूल’)

एनसीबीकडून होत आहे चौकशी

आर्यन खानसह मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनी सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. 20 ऑक्टोबर रोजी या अर्जावर बुधवारी विशेष एनडीपीएस न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सतीश मानेशिंदे यांनी आर्यन खानच्या बाजूने पक्ष ठेवला तर एनसीबीकडून ए एसजी अनिल सिंह पैरवी यांनी आपली बाजू मांडली. ड्रग्स सप्लाय प्रकरणीसुद्धा आर्यन खानची एनसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यासाठी एनसीबीकडून आर्यन खानच्या अतिरिक्त कोठडीची मागणी करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली असून, आता आर्यन खानचा जामीन अर्जही फेटाळला आहे.

(हेही वाचाः आता आर्यन खानसाठी शिवसेनेची न्यायालयात धाव)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.