“मी चांगला माणूस बनवून दाखवेन…” आर्यन खानने दिला शब्द

कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींचे देखील एनसीबी कोठडीत असताना समुपदेशन करण्यात आल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे.

83

मी इकडून बाहेर पडल्यावर चांगली व्यक्ती बनून दाखवेन, असा शब्द बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने एनसीबी आणि त्याला समुपदेशन करायला आलेल्या सामाजिक संस्थेला दिला आहे. ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे एनसीबीकडून समुपदेशन करण्यात येते. यासाठी एनसीबीकडून सामाजिक संस्थांची मदत घेतली जाते. कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींचे देखील एनसीबी कोठडीत असताना समुपदेशन करण्यात आल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे.

एनसीबीकडून समुपदेशन

कॉर्डिलिया क्रूझ रेव्ह पार्टीत अटक करण्यात आलेल्या सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे एनसीबी कोठडीत एका सामाजिक संस्थेच्या मदतीने समुपदेशन करण्यात आले असल्याची माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट, मूनमून धमेचा यांच्यासह इतर आरोपींचे एनसीबी कोठडीत असताना समुपदेशन करण्यात आले होते. यावेळी आर्यनसह इतरांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, त्याचा समाजावर होणारे परिणाम याबद्दल सांगण्यात आले.

(हेही वाचाः आर्यन खानला कोणी पाठवली तुरुंगात मनीऑर्डर? वाचा…)

काय म्हणाला आर्यन खान?

अंमली पदार्थांचे सेवन करणे, तसेच समाजात अंमली पदार्थ पुरवठा करणे याबाबत स्वतःला, कुटुंबियांना होणारा त्रास, तसेच समाजावर होणारा दुष्परिणाम याबाबत माहिती देण्यात आली. आर्यन खानला एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी स्वतःहून समुपदेशन केले. यावेळी आर्यन खानने मी येथून बाहेर पडल्यानंतर चांगला व्यक्ती बनवून दाखवेन, चांगली कामे करेन, एनसीबीच्या अधिकऱ्यांना गर्व वाटेल, असे काम करण्याचा प्रयत्न करेन, अशा शब्दांत आर्यन खानने एनसीबीला आश्वासन दिले आहे.

(हेही वाचाः आर्यन खान अडकला! ईदही तुरूंगातच साजरी करावी लागणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.