पर्यावरणावरील प्रदर्शनासाठी ठरवले अनोखे शुल्क!

128

नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने पुण्यातील असीमित आणि अनुनाद एज्युकेशनल अँड रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन या संस्थांनी ‘पृथ्वीची कहाणी : माझा ग्रह – माझे घर’ या विषयावरील हे प्रदर्शन ४ व ५ मार्चला आयोजित केले आहे. प्रदर्शनाला प्रवेश शुल्क म्हणून, प्लास्टिकच्या दहा बाटल्या आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या महाविद्यालयांचा सहभाग

गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या बाबुराव जोशी या  ग्रंथालयात सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. या प्रदर्शनात पृथ्वीच्या निर्मितीपासून आत्तापर्यंत झालेल्या बदलांची माहिती आणि महाराष्ट्रात आढळणाऱ्या जैवविविधता विभागांची माहिती दिली आहे. या प्रदर्शनासाठी सहआयोजक म्हणून गोगटे- जोगळेकर महाविद्यालय, निसर्गयात्री संस्था आणि लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी सहभागी होत आहे.

पृथ्वीचे महत्त्व

विज्ञान आणि पर्यावरण याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृत व्हावी, पृथ्वी आणि तिचे विश्वातील महत्त्व त्यांच्या लक्षात यावे, यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. या प्रदर्शनाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन असीमितचे सारंग ओक, निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबूड, मैत्री ग्रुपचे सुहास ठाकूरदेसाई आणि अनुनादच्या पूजा खांडेकर यांनी केले आहे.

( हेही वाचा :ठाणे महानगरपालिका आणि वनविभाग बसवतेय ‘या’ माणसाळलेल्या प्राण्यावर मायक्रोचिपिंग! )

बाटल्या आणा आणि प्रदर्शन पाहा

मानवनिर्मित कचऱ्याचा निसर्ग आणि जैवविविधतेवर होणारा परिणाम विद्यार्थी व नागरिकांना कळावा व त्यांच्याकडून त्याची काही प्रमाणात भरपाई व्हावी, या हेतूने या उपक्रमासाठी १० रिकाम्या प्लास्टिक बाटल्या हे अनोखे प्रवेश शुल्क ठेवलेले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने पाण्याच्या १ लिटरच्या १० रिकाम्या प्लास्टिक बाटल्या आणायच्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.