नवीन मोटार वाहन कायद्यानुसार कोणत्याही वाहनांचा विमा काढणे आता बंधनकारक आहे. कित्येकदा वाहन चालक विमा संपल्यानंतर पुन्हा विम्यासाठी अर्ज करण्यासाठी टाळाटाळ करतात. मात्र आता असे करणे चांगलेच महागात पडू शकते. तुम्ही देखील तुमच्या वाहनाचा विमा काढला नसेल तर तो लवकरात लवकर काढा नाहीतर तीन वर्षांचा तुरूंगवास होऊ शकतो.
(हेही वाचा – ‘तोंड आवरा, पुन्हा आराम करायची वेळ येऊ नये’, शिंदे गटातील ‘या’ मंत्र्याचा राऊतांना थेट इशारा)
तुमच्याकडे कोणतेही वाहन असो जर तुमच्याकडे त्या वाहनाचा विमा नसेल तर ते वाहन बेकायदा ठरतात. इतकेच नाही तर अशा वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई देखील केली जाते. मोटार वाहन कायदा हा प्रवाशांसह वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी आहे. वाहनांचा विमा आहे म्हणजे ते वाहन रस्त्यावर धावण्यास पात्र आहे.
…म्हणून विमा असणं आवश्यक आहे
- दुचाकी, तीन-चार चाकी वाहनांना विमा असल्यास वाहनधारकांना आर्थिक संरक्षण मिळते. तसेच दुर्दैवाने अपघात झाल्यास कायदेशीर संरक्षणही मिळते.
- विमा असल्यास थर्ट पार्टी विमा देखील मिळतो. त्यामुळे दुचाकी वाहनचालकांनी विमा काढणे त्यांच्याच फायद्याचे आहे.
- वाहनांचा विमा असण किती आवश्यक आहे, याबाबत वाहतूक विभागाकडून वेळोवेळी जनजागृती केली जाते. पण तरीही अनेक वाहनधारक विमा काढण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते.