पावसाला ब्रेक लागताच लेप्टोच्या रुग्णांची वाढली संख्या

जुलैच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने मुंबईत दाणादाण उडवून दिली असताना मुंबईत पावसाच्या साचलेल्या पाण्यातून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना लेप्टोची लागण होईल ही पालिका आरोग्य विभागाची भीती खरी ठरली आहे. मुंबईत आठवड्याभरात 69 लेप्टोचे रुग्ण आढल्याची माहिती मंगळवारी पालिका आरोग्य विभागाने जाहीर केली.

(हेही वाचा – मुंबईत ‘स्वाईन फ्लू’चा कहर, सहा पटीने वाढले रुग्ण)

मुंबईत लेप्टोच्या रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून प्रतिबंधात्मक औषधेही पालिकेच्या वतीने दिली गेली होती. पावसाच्या पाण्यात चालणाऱ्यामध्ये लेप्टोची लक्षणे दिसून येताच तपासणीचे आवाहनही केले गेले होते. परंतु वेळीच लक्षणावर वेळीच लक्ष न दिल्याने मुंबईत लेप्टो वाढल्याचे बोलले जात आहे.

लेप्टोची जुलै महिन्यातील आकडेवारी 

  • 10 जुलै – 5
  • 17 जुलै – 11
  • 24 जुलै – 69

लेप्टोस्पायरोसीसची लक्षणे

  • तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, थंडी वाजणे, डोळे सुजणे
  • मूत्रपिंड किंवा यकृत निकामी होऊन मृत्यूचीही शक्यता असते
  • ब-याचदा लक्षणे किरकोळ किंवा न समजून येणारी असतात

रोगनिदान

रॅपीड डायग्सोस्टीक कीट अथवा एलायझा चाचणी द्वारे या आजाराचे निदान करता येते

उपचादरपद्धती

पेनिसिलीन, डॉक्सीसायक्लीन, टेट्रायासक्लिन, एझिथ्रोमायसीन ही औषधे रुग्णांना दिली जातात.

प्रतिबंधात्मक उपाय

  • दूषित पाणी, माती किंवा भाज्यांशी मानवी संपर्क टाळणे
  • अपरिहार्य परिस्थितीत रबर बूट, हात-मोजे वापरावेत
  • प्राण्यांच्या लघवीमुळे पाणीसाठे दूषित होणार नाहीत, याची काळजी घ्यावी
  • परिसरातील उंदीरांचे नियंत्रण

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here