काही क्षणांसाठी मुंबई झाली ओली चिंब!

141

वीकेण्डची सुरुवात होताच शनिवारी मुंबईत काही ठिकाणी पावसाचे शिडकावे झाल्याची नोंद झाली. पवई, सांताक्रूझ, बोरिवली आदी परिसरात काही मिनिटांसाठी मुंबईकरांनी शिडकावा अनुभवला. गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमान वीस अंशाखाली पोहोचलेले असताना शनिवारी पावसाचे शिडकावे पडल्याने वातावरण अजूनच आल्हाददायक झाले. दिवसभरात हलका शिडकावा अनुभवता येईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.

कमाल तापमानात घसरण

शुक्रवारपासून कमाल तापमानही तीस अंशाखाली गेल्याने आठवड्याच्या सुरुवातीला गुडूप झालेली थंडी वीकेण्डजवळ येताच हळूहळू परत येत असल्याचा अनुभव मुंबईकरांना येत आहे. आठवड्याभरात किमान तापमान १७ ते १९ अंशादरम्यान असताना कमाल तापमानात घसरण दिसून येत नव्हती.

(हेही वाचा – बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अंथरली झाडा-फुलांची भगवी शाल!)

रविवारी आकाश ढगाळ राहणार

परंतु आता किमान तापमानाही खाली घसरत असल्याने किमान तापमानाच्या प्रभावाने तसेच पावसाच्या शिडकाव्यांनी दोन दिवसांत तापमानात पुन्हा फरक जाणवेल. सोमवारपर्यत किमान तापमान १५ तर कमाल तापमान २७ अंश सेल्सिअसवर पोहोचेल, असाही अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. उद्या, रविवारी केवळ आकाश ढगाळ राहील, असेही वर्तवण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.