कोरोना नियंत्रणात तरीही मास्क वापरा…

124

मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण बऱ्यापैकी नियंत्रणात आले आहे. तरीही मुंबईत स्वाईनफ्लूच्या केसेस वाढत असल्याने मास्क वापरण्याचे आवाहन मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

(हेही वाचा – काँग्रेसचे चौधरी ‘अधीर’ झाले आणि राष्ट्रपतींचा अपमान करुन बसले, पण तरीही माफी न मागण्यावर ठाम)

मुंबईत गेल्या महिन्यापासून स्वाईन फ्लूच्या केसेस दिसून येत होत्या, सद्यस्थितीत 62 स्वाईन फ्लूचे केसेस मुंबईभरात आढळून आले आहेत. गेल्या वर्षी मुंबईत स्वाईन फ्लूचा आजार आढळून आला नाही, 2020 साली स्वाईन फ्लूचे रुग्ण मुंबईत दिसून आले होते. आता खबरदारीचा उपाय म्हणून कस्तुरबा रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग सुरु केल्याची माहिती पालिका आरोग्य अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी दिली.

तापकडे दुर्लक्ष नको

स्वाईनफ्लूवर मुंबईत उपचार पालिका आरोग्य विभागाकडे उपलब्ध आहेत. ताप येत असेल तर तातडीने स्वाईन फ्लूची तपासणी करा. पालिकेने 8/9 खासगी प्रयोगशाळांना स्वाईन फ्लूच्या चाचणीसाठी परवानगी दिली आहे.

अतिजोखमीच्या व्यक्ती  

० ५ वर्षांखालील मुले

० ६५ वर्षांखालील प्रौढ व्यक्ती

० दमा, हृदयाचे आजार, मूत्रपिंडाचे विकार, मधुमेह, यकृताचे विकार, रक्त किंवा चेतासंस्थांचे विकार असलेल्या रुग्णांना स्वाईन फ्लूची बाधा होण्याची दाट शक्यता असते

० सततच्या आजारपणामुळे रोग प्रतिकारकशक्ती कमी झालेल्या, स्टॅरोईड्स प्रकारातील औषधे दीर्घ काळापासून घेणा-या व्यक्ती, एचआयव्ही बाधित रुग्ण

० गरोदर महिला किंवा स्थूल व्यक्ती

उपचार 

ऑसेलटॅमीवीर व झानामीवीर ही औषधे उपचारासाठी उपलब्ध आहेत. तसेच इंजेक्शनद्वारे तसेच नेसल स्प्रे स्वरुपातील लस उपलब्ध आहे.

काय टाळाल

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, धुम्रपान टाळा, लक्षणे आढळल्यास गर्दीत मिसळू नका

प्रतिबंधात्मक उपाय

० सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा

० डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका

० गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा

० वारंवार हात स्वच्छ धुवा, पौष्टिक आहाराचे सेवन करा

० लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्यांचे सेवन वाढवा

० धूम्रपान टाळा

० पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.