AC लोकलचे दरवाजे उघडलेच नाहीत, प्रवाशांमध्ये मनःस्ताप; करावी लागली पायपीट

सध्या एसी लोकलने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोणत्याही ऋतूमध्ये एसी लोकलला प्रवाशी पसंती देत आहेत. मात्र ठाण्यात स्थानकात शुक्रवारी एसी लोकलच्या प्रवाशांना मनःस्ताप सहन करावा लागल्याचे समोर आले आहे.

काय घडला प्रकार

शुक्रवारी रात्री ११.४४ च्या सुमारास आलेल्या एका एसी लोकलचे दार न उघडल्याने प्रवाशांना थेट कारशेडमध्ये जावे लागले. त्यामुळे काही प्रवाशांना मनःस्ताप झाला. यानंतर प्रवाशांना त्यांच्या स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागली. यावेळी जागरूक प्रवाशाने ही बाब ट्विटद्वारे रेल्वे प्रशासनाच्या आणि नागरिकांच्या निदर्शनास आणून दिली. यापूर्वी देखील एसी लोकलचे दार न उघडण्याचा प्रकार दादर स्थानकात घडला होता.

(हेही वाचा – बुलढाण्यातील MSRTC बस पत्रा अपघात प्रकरणी चालक-वाहक निलंबित)

सीएसएमटीहून ठाण्यापर्यंत डाऊन मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलचे दरवाजे शुक्रवारी उघडले नाहीत, ही माहिती सोशल मीडियावर फिरू लागली. ही माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी समजली. यावेळी संबंधित लोकलच्या गार्डशी बोलणे झाले तेव्हा त्याने दरवाजे उघडण्याचे बटण दाबल्याचे सांगितले. मात्र यानंतर सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले जात असल्याचे ठाणे स्थानक मॅनेजरने सांगितले. तसेच जी माहिती निदर्शनास येईल ती वरिष्ठ पातळीवर दिली जाईल, असे सुतार यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here