आशापूर्णा देवी (Ashapurna Devi) यांचा जन्म ८ जानेवारी १९०९ रोजी उत्तर कलकत्ता येथे एका बैद्य कुटुंबात झाला. त्यांचे बालपण पारंपारिक आणि अत्यंत रूढिवादी कुटुंबात गेले. घरातील मुलींना शाळेत जाऊ दिले जात नव्हते. फक्त मुलांसाठी खाजगी शिकवणी लावली जात होती. त्या लहान असताना त्यांच्या भावंडांचा अभ्यास त्यांच्या समोर बसून ऐकायच्या आणि त्यामुळेच त्यांना मुळाक्षरे शिकता आल्या.
त्यांचे वडील हरेंद्र नाथ गुप्ता हे त्या काळचे प्रसिद्ध कलाकार होते, जे सी. लझारस ऍंड कं येथे डिझायनर म्हणून काम करत होते. वडिलांच्या कडक शिस्तीमुळे त्यांचे बाहेरच्या जगाशी फारसे संबंध आले नाही. त्या आणि त्यांच्या बहिणी कविता पाठ करुन व लिहून एकमेकांशीच स्पर्धा करायच्या. त्या गुपचूप आपल्या कविता बाहेर पाठवायच्या. १३ व्या वर्षी त्यांची कविता प्रकाशित झाली होती.
(हेही वाचा – Bangladesh Election 2024 : शेख हसीना यांचा दणदणीत विजय; पाचव्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार)
सुरुवातीस आशापूर्णा देवी (Ashapurna Devi) फक्त मुलांसाठी लिहायच्या. छोटो ठाकूरदार काशी यात्रा ही १९३८ मध्ये प्रकाशित झालेली साहित्यकृती होती. पुढे त्या प्रौढ वाचकांसाठी देखील लिहू लागल्या. ’पत्नी ओप्रेयोशी’ ही कथा १९३६ मध्ये त्यांनी लिहिली. या नावाची काबंदरी देखील त्यांनी लिहिली. पुढे त्यांनी विपूल साहित्य निर्माण केले आणि अनेक पुरस्कारांवर स्वतःचे नाव कोरले.
१९७६ मध्ये त्यांना भारत सरकारकडून ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला आणि पद्मश्री पुरस्काराने देखील त्यांचा सन्मान करण्यात आला. विश्व भारती विद्यापीठाने १९८९ मध्ये त्यांना देशकोत्तम पुरस्काराने सन्मानित केले. कादंबरीकार आणि लघुकथा लेखक म्हणून त्यांच्या योगदानासाठी, साहित्य अकादमीने १९९४ मध्ये त्यांना साहित्य अकादमी फेलोशिप बहाल केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community