आशिष चेंबूरकर, गंगाधरे, बब्बू खान, सुषम सावंत यांना अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा फटका

148

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जातीच्या १५ प्रवर्गाकरता आरक्षण सोडत काढण्यात आली असून यामध्ये महिला प्रवर्गांकरता ८ आणि याच्या खुल्या प्रवर्गांकरता ७ अशाप्रकारे सोडत काढण्यात आली आहे. यातील महिला प्रवर्गाच्या आरक्षणाचा फटका माजी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांच्यासह भाजपचे प्रकाश गंगाधरे, सुषम सावंत, जागृती पाटील यांच्या काँग्रेसचे बब्बू खान या मोठ्या नगरसेवकांना बसला आहे

( हेही वाचा : अनुसूचित जातीचे प्रभाग बनले अनूसूचित जमाती)

या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३९, १९०, १९४, १६५, १०७, ८५, ११९, २०४ हे आठ प्रभाग महिला आरक्षित झाले असून प्रभाग क्रमांक ६०, १५३, १५७, १६२, २०८, २१५ व २२१ हे प्रभाग पुरुष प्रवर्गांमध्ये अर्थात खुल्या प्रवर्गांमध्ये येत आहे.

यामध्ये वरळीतील विद्यमान प्रभाग २०४ हा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाला असून या प्रभागात विद्यमान नगरसवेक हे बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर हे होते, तर काही अंशी भाग हा दत्ता नरवण्कर यांचा आहे.

तर मुलुंडमधील विद्यमान १०४ व नवीन प्रभाग १०७ हा अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने त्या प्रभागाच नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनाही धक्का बसला आहे. तर पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या भाजपच्या जागृती पाटील यांचाही प्रभागा अनूसूचित जातीचा महिला आरक्षित झाला आहे.

कोणत्या पक्षाच्या कोणत्या नगरसेवकांना बसला अनुसूचित जाती प्रवर्गाचा फटका

शिवसेना : आशिष चेंबूरकर, अनिल पाटणकर आकांक्षा शेट्ये, किरण लांडगे

भाजप : प्रकाश गंगाधरे, सुरेखा लोखंडे, सुषम सावंत, श्रीकला पिल्ले

काँग्रेस : बब्बू खान, सुप्रिया मोरे, विनिफ्रेड डिसोझा,

राष्टवादी काँग्रेस : रेशमबानो

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.