BMC: आशीष शर्मा यांनी अतिरिक्त आयुक्त पदाचा भार स्वीकारला

101

मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून आशीष शर्मा यांनी गुरुवारी २६ मे २०२२ रोजी सकाळी पदभार स्वीकारला. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलीन सावंत यांनी शर्मा यांचे स्वागत केले.

आशीष शर्मा यांच्याबद्दलत…

शर्मा हे भारतीय प्रशासन सेवेतील १९९७ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. आय. आय. टी. दिल्लीमधून बी. टेक. पदवी संपादीत केल्यानंतर त्यांनी मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेस (पंजाब विद्यापीठ, चंदीगड) ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. तर प्रशासकीय सेवेत आल्यानंतर एम.एस्सी इन पब्लिक पॉलिसी ऍण्ड ऍडमिनिस्ट्रेशन ही पदव्युत्तर पदवी देखील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (युनायटेड किंग्डम) मधून २००६-२००७ मध्ये संपादीत केली आहे.

(हेही वाचा – मध्य रेल्वेचा विशेष Traffic Block; बघा कोणत्या गाड्या रद्द)

प्रशासकीय सेवेचा दांडगा अनुभव

शर्मा यांना प्रशासकीय सेवेचा दांडगा अनुभव आहे. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वाशिमचे जिल्हाधिकारी, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी, केंद्रीय अपारंपरिक उर्जा मंत्र्यांचे खासगी सचिव, कृषी व पशुसंवर्धन विभागाचे महाराष्ट्र राज्य आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांवर त्यांनी कामकाज केले आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर असताना कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे सहसचिव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सदस्य सचिव (वित्त), कार्मिक एवं प्रशिक्षण विभागाचे सहसचिव या पदांवर सेवा बजावली आहे.

गुरुवारी महापालिका स्वीकारला पदभार

केंद्रातील प्रतिनियुक्तीवरुन महाराष्ट्र राज्य शासनाकडे शर्मा हे रुजू झाल्यानंतर प्रधान सचिव श्रेणीमध्ये अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी गुरुवारी महापालिका मुख्यलयात अतिरिक्त आयुक्त (शहर) या पदाचा भार स्वीकारला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.