Ashok Chakra : भारताच्या झेंड्यामध्ये अशोक चक्राचा समावेश का करण्यात आला? काय आहे अर्थ आणि हेतू?

184
Ashok Chakra : भारताच्या झेंड्यामध्ये अशोक चक्राचा समावेश का करण्यात आला? काय आहे अर्थ आणि हेतू?
Ashok Chakra : भारताच्या झेंड्यामध्ये अशोक चक्राचा समावेश का करण्यात आला? काय आहे अर्थ आणि हेतू?

सम्राट अशोकाच्या (Ashok Chakra) अनेक शिलालेखांवर, एक चक्र सहसा आढळून येते. याला अशोक चक्र (Ashok Chakra) म्हणतात. हे चक्र धर्मचक्राचे प्रतीक आहे. उदाहरणार्थ, अशोक चक्र सिंह-चतुर्मुख (सिंहाची राजधानी) आणि सारनाथ येथील अशोक स्तंभावर आहे. भारताच्या राष्ट्रध्वजात अशोक चक्राला स्थान देण्यात आले आहे. (Ashok Chakra)

(हेही वाचा- Brazil Flood: ब्राझीलमध्ये महापूराचे थैमान! आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू)

अशोक चक्र (Ashok Chakra) हे सम्राट अशोकाच्या काळापासून शिल्पांद्वारे कोरले गेले होते. धर्म चक्राचा अर्थ: भगवान बुद्धांनी आपल्या अनेक उपदेशांमध्ये अज्ञानापासून दु:खापर्यंतच्या बारा अवस्था आणि दु:खापासून निर्वाणापर्यंतच्या (जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती) बारा अवस्थांचे वर्णन केले आहे. अशोक चक्राला चोवीस आरे आहेत; ते अज्ञानापासून दु:खापर्यंत (बारा आरे) आणि दु:खापासून निर्वाण (बारा आरे) या स्थितीचे प्रतीक आहेत. (Ashok Chakra)

धर्माद्वारे माणसामध्ये असे गुण विकसित केले जातात, जे त्याला दु:खापासून दूर आणि सुखाच्या जवळ घेऊन जातात. अशोक चक्रातील (Ashok Chakra) २४ आरे माणसाच्या चोवीस गुणांचे प्रतिनिधित्व करतात. आपण यांस २४ धार्मिक मार्ग किंवा २४ नियम किंवा २४ कर्तव्ये आदेखील म्हणू शकतो. तर जाणून घेऊया काय आहे याचा अर्थ? (Ashok Chakra)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: २३ देशांमधील ७५ निवडणूक व्यवस्थापन प्रतिनिधी महाराष्ट्राचा दौरा करणार; कसे असेल स्वरुप?)

अशोकचक्रावरील २४ आरे, म्हणजे पुढीलप्रमाणे २४ सद्गुणांचे द्योतक आहेत:

१. संयम
२. आरोग्य
३. शांतता
४. त्याग
५. चारित्र्य
६. सेवा
७. क्षमा
८. प्रेम
९. मैत्री
१०. बंधुभाव
११. संघटन
१२. कल्याण
१३. समृद्धी
१४. उद्योग
१५. सुरक्षा
१६. नियम
१७. समरसता
१८. अर्थ-धनाचा सदुपयोग
१९. नीमिमत्ता
२०. न्याय
२१. सहकार्य
२२. कर्तव्य
२३. अधिकार
२४. बुद्धिमत्ता

(हेही वाचा- Terrorist attack: पुंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला, हवाई दलाचा जवान हुतात्मा, ४ जखमी)

आपला भारतीय ध्वज संविधान सभेने २२ जुलै १९४७ रोजी स्वतंत्र भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला होता. भगवा हा देशाची ताकद आणि धैर्य दर्शवणारा रंग आहे. मध्यभागी असलेला पांढरा पट्टा धर्मचक्रासह शांती आणि सत्याचे प्रतीक आहे. खालची हिरवी पट्टी जमिनीची सुपीकता, वाढ आणि शुद्धता दर्शवते.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.