सुजित महामुलकर
‘पुत्रप्रेम’ या एका शब्दावर अगदी रामायणापासून (Ramayan) महाभारत (Mahabharat) ते आताच्या अनेक राजकीय पक्ष प्रमुखांची वाटचाल सुरु असल्याचे दिसून येते. यातून भले राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे कसे सुटतील?
आध्यात्मिक गुरु
चव्हाण (Ashok Chavan) यांनीही स्वतःच्या आणि कन्या श्रीजया हिच्या राजकीय भवितव्यासाठी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती चव्हाण यांचे आध्यात्मिक गुरु (spiritual leader), महंत पिठाधीश्वर डॉ अनिकेतशास्त्री महाराज (Pithadhishwar Dr Aniket Shastri Maharaj) यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला (Hindusthan post) दिली.
(हेही वाचा – UP STF Halal Council : यूपी एसटीएफकडून हलाल कौन्सिल ऑफ इंडियाच्या ४ पदाधिकाऱ्यांना अटक)
चव्हाण पक्षात अस्वस्थ
गेले अनेक महिने चव्हाण (Ashok Chavan) पक्षात अस्वस्थ होते. त्यांची उद्विग्नता त्यांनी बोलून दाखवली. थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर नाराजी व्यक्त करत त्यांनी पक्षातील बेशिस्तीवर बोट ठेवले. प्रदेश काँग्रेसच्या कारभारात समन्वयाचा पूर्ण अभाव, मनमानी कारभार आणि निवडणूक जिंकण्यासाठीची उदासीनता दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘परिवर्तन योग’
महंत डॉ अनिकेत देशपांडे हे अखिल भारतीय संत समिती धर्म समाजच्या महाराष्ट्र प्रदेश प्रमुखपदी असून चव्हाण यांच्याप्रमाणे अन्य काही राजकीय नेते, पुढारी यांनाही मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या ‘परिवर्तन योग’ सल्ल्यानुसारच चव्हाण यांनी पक्ष परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आणि पावले टाकली. (Ashok Chavan)
(हेही वाचा – Ashok Chavan : आजपासून राजकीय प्रवासाची नवीन सुरुवात)
पक्ष प्रवेशासाठी दुपारचा मुहूर्त
काल सोमवारी १२ फेब्रुवारीला चव्हाण (Ashok Chavan) यांनी ‘सर्वार्थ सिद्ध योग्’ मुहूर्त पाहून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आणि आज मंगळवारी १३ फेब्रुवारीला ‘अभिजित मुहूर्त’ गाठत दुपारी १२.-२ या दिलेल्या वेळेत पक्ष प्रवेश केला.
डॉ देशपांडे यांनी सांगितले कि, “त्यांना मी परिवर्तन करण्याचा सल्ला दिला होता. मग त्यांनी स्वतःचा वेगळा पक्ष की अन्य पक्षात प्रवेश करावा हा त्यांचा निर्णय आहे. पण परिवर्तन करणे गरजेचे होते, ते महत्वाचे.” (Ashok Chavan)
(हेही वाचा – Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली उपमुख्यमंत्रीपद रद्द करण्याची मागणी)
कन्येला अनेक वर्षे लाभदायक
चव्हाण (Ashok Chavan) यांना सुजया आणि श्रीजया अशा दोन कन्या असून श्रीजया यांच्या रूपाने चव्हाण कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात येणार असल्याची चर्चा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’च्या नांदेड येथील पदयात्रेत होत होती. त्याचे कारण श्रीजया यांचा फोटो काँग्रेसच्या होर्डिंग्जवर झळकत होता. “तिच्या भविष्यासाठीही परिवर्तन गरजेचे होते. आणि त्याचा त्यांच्या कन्येला पुढे अनेक वर्षे लाभ होईल,” असे डॉ देशपांडे यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community