वंदे भारत एक्सप्रेस चालवली महिलेने: पहिल्या महिला लोको पायलटची अशीही दैदिप्यमान कामगिरी

asia's first woman loco pilot drives vande bharat express know about surekha yadav
वंदे भारत एक्सप्रेस चालवली महिलेने: पहिल्या महिला लोको पायलटची अशीही दैदिप्यमान कामगिरी

आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी सोमवारी सोलापूर ते सीएसएमटी ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालविली. सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे पायलट करताना पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी मध्य रेल्वेच्या शिरपेचात एक महिला वंदे भारत एक्सप्रेस लोको पायलट म्हणून नाव कोरले. सुरेखा यादव यांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक ८ वर सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्रातील सातारा येथील, सुरेखा यादव यांनी १९८८ मध्ये भारतातील पहिली महिला रेल्वे चालक बनण्याचा मान मिळवला होता. आता पहिल्या महिला लोको पायलट म्हणून ओळख असलेल्या या सुरेखा यादव यांनी सोलापूर ते सीएसएमटी या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनही चालवण्याचा मान मिळवला आहे. या प्रवासाबद्दल बोलतांना सुरेखा यादव म्हणाल्या की, नवीन काळातील, अत्याधुनिक तंत्रज्ञान वंदे भारत ट्रेनचे पायलट करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञ आहे.  गाडी योग्य वेळी सोलापूरहून निघाली आणि वेळेच्या ५ मिनिटे आधीच सीएसएमटीला पोहोचली.

ट्रेन चालविणे शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सिग्नल पाहणे, नवीन उपकरणे वापरणे, इतर क्रू मेंबर्ससोबत समन्वय, ट्रेन चालवण्यासाठी सर्व पॅरामीटर्स पाळणे यांचा समावेश असतो. महाराष्ट्रातील सातारा येथील, सुरेखा यादव या, १९८८ मध्ये भारतातील पहिली महिला रेल्वे चालक बनल्या. तिच्या कामगिरीसाठी, तिला राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

(हेही वाचा – #Exclusive शिवाजी पार्कमधील ‘तो’ खड्डा बुजवला, आता चालता येणार बिनधास्त)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here