आसाममध्ये मोठी दुर्घटना! ब्रह्मपुत्रा नदीत बोट बुडाली; ३० लोक करत होते प्रवास

139

आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीत गुरूवारी सुमारे ३० जणांना घेऊन जाणारी बोट उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. धुबरी जिल्ह्यात हा अपघात झाला असून बोटीतील ६ ते ७ जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आसाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सीईओ ज्ञानेंद्र देव त्रिपाठी यांनी या अपघाताविषयी माहिती दिली. ही अपघातग्रस्त बोट स्वदेशी बनावटीची यांत्रिक बोट आहे. याबाबतचा अधिक तपास आसाम आपत्ती व्यवस्थापन करत आहे. नावेवर कालवा ओलांडत असताना ही नाव प्रवाहात कशावर तरी आदळून हा अपघात झाल्याची माहिती त्रिपाठी यांनी दिली आहे.

बचावकार्य सुरू 

सध्या मोठ्या प्रमाणात शोध कार्य सुरू आहे. बोटीवर ज्या लोकांना पोहता येत होते असे लोक बचावले. राज्य आपत्ती प्रतिसाद दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि सीमा सुरक्षा दलाची पथके शोध आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत अशी माहितीही त्रिपाठी यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.