Assembly Election 2023: त्रिपुरा आणि नागालॅंडमध्ये भाजप आघाडीवर; तर मेघालयात भाजपची स्थिती काय? जाणून घ्या आतापर्यंतचे अपडेट

ईशान्य भारतातील तीन राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. मेघालय, नागालॅंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले. तर त्रिपुरा, राज्यात 16 फेब्रुवारी रोजी मतदान संपन्न झाले होते. गुरुवारी तिन्ही राज्यांची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून, निकाल हाती येणार आहेत. त्रिपुरात भाजप, नागालॅंडमध्ये एनडीएचा सहकारी नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी आणि मेघालयात नॅशनल पीपल्स पार्टी आपली सत्ता राखण्यात यशस्वी होणार का? याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.

( हेही वाचा: Pune Bypoll Election Results 2023: चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, कसब्यात रवींद्र धंगेकर आघाडीवर; जाणून घ्या आतापर्यंतचे अपडेट )

त्रिपुरात भाजप 36, कम्युनिस्ट पार्टी 15, टीएमसी 9 जागांवर आघाडीवर आहे. नागालॅंडमध्ये एनडीएचा घटकपक्ष एनडीपीपी 37, एनपीएफ 8 आणि काॅंग्रेस 2 तर अपक्ष 13 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. मेघालयात एनपीपी 27, काॅंग्रेस 5 आणि भाजप 7 जागांवर आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्रिपुरा, नागालॅंडमध्ये भाजप आघाडीवर

त्रिपुरात भाजप 39 जागांवर आघाडीवर आहे. तर, कम्युनिस्ट पार्टी 15, टीएमसी 6 जागांवर पुढे आहे. नागालॅंडमध्ये एनडीचा घटकपक्ष असलेली एनडीपीपी 50, एनपीएफ 6, तर काॅंग्रेस एक जागेवर आघाडीवर आहे. मेघालयात एनडीपीपी 22, भाजप 10, टीएमसी 10, यूडीपी 8 आणि काॅंग्रेस 6 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here