वाहतूक पोलिसांचे भ्रष्टाचार सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील टोके यांनी पुरवाव्यांसह उघड केले आहेत. वाहतूक पोलिसांनी हप्ता वसुलीसाठी प्रत्येक विभागात दोन हवालदार नेमल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. नेमलेले दोन हवालदार हप्ता वसूली करतात आणि ते पैसे वरिष्ठांपर्यंत पोहोचवले जातात. यामागे खूप मोठी साखळी असल्याचेही पोलीस सुनील टोके यांनी सांगितले आहे.
मुंबई पोलीस दखल घेत नाहीत
या प्रकरणी पोलीस सुनील टोके यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. ठाणे, नवी मुंबई पाठोपाठ मुंबई पोलीस दलातील वाहतूक पोलिसांच्या भ्रष्टाचाराबाबतचे पुरावे त्यांनी उच्च न्यायालयात दिले. मात्र, या आरोपांनंतर त्यांच्यावर पुन्हा निलंबनाची कारवाई केल्यामुळे, याविरोधातही उच्च न्यायालय तसेच मॅटमध्ये जाणार असल्याचे टोके यांनी सांगितले. हवालदार जी वसुली करतात त्याची साखळी वरिष्ठांपर्यंत असल्याची तक्रार वारंवार मुंबई पोलिसांकडे केली, पण त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळेच त्यांनी 2017 मध्ये याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
सुनावणी फेब्रुवारीमध्ये
तसेच गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सुनील टोके यांनी सांगितले आहे. त्यानुसार, पुढील सुनावणी फेब्रुवारीत होणार आहे.
( हेही वाचा: मुंबईत आता अनेक ठिकाणी होत आहेत बेहरामपाडे! )
असं आहे पोलिसांचं भ्रष्टाचाराचं रेटकार्ड
- हाॅटेल्स, काॅर्पोरेट कंपन्यांचे बेकायदा पार्किंगसाठी – दरमहा 40 ते 50 हजार
- काॅर्पोरेट कंपन्यांचे रस्ते खोदकाम – 50 हजार ते 1 लाख
- चित्रीकरणासाठी -50 ते 1 लाख
- नेस्को, बीकेसीतील मोठ्या आयोजनासाठी -1 लाख
- बेकायदेशीर रिक्षा टॅक्सी चालक – दरमहा 1 ते 2 हजार रुपये
- डाॅमिनोज, मॅकडोनल्ड, पिझ्झा हटकडून -20 ते 25 हजार
- दुचाकी शोरुम -5 हजार
- चारचाकी शोरुम – 10 हजार
- टॅंकर- दिवसाला -100 ते 200 रुपये
- बांधकाम प्रकल्प -25 चे 30हजार
- ओव्हरलोडिंग ट्रककडून -दिवसाला 3 ते 4 हजार
- बेकायदा विद्यार्थी व्हॅनकडून -1 ते 2 हजार