Astronaut Buzz Aldrin : चंद्रावर पाय ठेवणारे दुसरे अंतराळवीर बझ एल्ड्रिन

२० जुलै १९६९ रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवणारे बझ एल्ड्रिन हे दुसरे व्यक्ती होते. त्यांच्या आधी मिशन कमांडर नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पाऊल ठेवले होते. रिटर्न टू अर्थ, मेन फ्रॉम अर्थ आणि मेगनिफिकेंट डेसोलेशन ही पुस्तके लिहिली आहेत.

542
Astronaut Buzz Aldrin : चंद्रावर पाय ठेवणारे दुसरे अंतराळवीर बझ एल्ड्रिन

बझ एल्ड्रिन (Astronaut Buzz Aldrin) यांचा जन्म २० जानेवारी १९३० रोजी अमेरिकेत झाला. १९४६ मध्ये मॉन्टक्लेअर हायस्कूलमधून पदवी घेतल्यानंतर त्यांना मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून शिष्यवृत्तीची ऑफर मिळाली आणि ते वेस्ट पॉइंट येथील यूएस मिलिटरी अकादमीत दाखल झाले. त्यांचे खरे नाव एडविन आहे. मात्र त्यांना लाडाने “बझ” (Astronaut Buzz Aldrin) म्हटले जाते.

(हेही वाचा – Fareed Zakaria: पद्मभूषण, भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि लेखक फरीद रफिक झकारिया)

‘बझ’ हे नाव कसे पडले ?

बझ (Astronaut Buzz Aldrin) या शब्दाचा अर्थ लहान भाऊ. त्यांना दोन मोठ्या बहिणी आहेत, त्या त्यांना बझ हाक मारायचा. म्हणून सगळेच त्यांना बझ म्हणू लागले. पुढे एल्ड्रिन यांनी १९७९ मध्ये कायदेशीररित्या त्यांचे नाव बदलले. त्यांनी कोरियाच्या युद्धादरम्यान जेट फायटर पायलट म्हणून काम केले. तसेच जर्मनीत ते कमांडर म्हणून एफ-१०० सुपर सब्रे वर स्वार झाले होते. त्यांचा युद्धाचा अनुभव खूपच दणकट होता.

(हेही वाचा – Amit Shah : ईशान्येकडील प्रदेशात शांततेच्या नव्या आणि शाश्वत युगाची सुरुवात – अमित शाह)

चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवणारे दुसरे व्यक्ती –

ते एक अमेरिकन मेकॅनिकल अभियंता आणि युनायटेड स्टेट्स एअर फोर्सचे निवृत्त पायलट आहेत. ते एक अंतराळवीरही होते. ते अपोलो ११ च्या लूनार मॉड्यूलचे पायलट होते. २० जुलै १९६९ रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवणारे ते (Astronaut Buzz Aldrin) दुसरे व्यक्ती होते. त्यांच्या आधी मिशन कमांडर नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पाऊल ठेवले होते. रिटर्न टू अर्थ, मेन फ्रॉम अर्थ आणि मेगनिफिकेंट डेसोलेशन ही पुस्तके लिहिली आहेत. तसेच त्यांनी एनकाउंटर विथ टायबर आणि द रिटर्न ही दोन विज्ञान कादंबरी लिहिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.