युरेनस ग्रहाचा शोध लावणारे महान खगोलशास्त्रज्ञ Sir William Herschel

170
सर फ्रॅडरिक व्हिलियम हरशॅल (Sir William Herschel) हे जर्मन वंशाचे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ आणि संगीतकार होते. वयाच्या १९ व्या वर्षी ते जर्मनी सोडून ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. त्यांनीच युरेनस ग्रहाचा शोध लावला. दुर्बिणीद्वारे ओळखलेला हा पहिला ग्रह होता. याशिवाय युरेनसचे दोन उपग्रह आणि शनीचे दोन उपग्रह देखील त्यांनी शोधून काढले आहेत.
फ्रॅडरिक व्हिलियम हरशॅल (Sir William Herschel) यांचा जन्म १५ नोव्हेंबर १७३८ रोजी हनोवर, जर्मनी येथे झाला. गंमत म्हणजे वयाच्या चौदाव्या वर्षी ते एका स्थानिक रेजिमेंटल बँडमध्ये सामील झाले होते. चार वर्षांनंतर त्यांनी आपल्या बँडसोबत इंग्लंडचा दौरा केला होता. ते १७५७ मध्ये इंग्लंडमध्ये स्थायिक झाले आणि त्यांनी संगीतकार म्हणून कारकीर्द सुरू केली. त्यांनी ऑक्टागोन चॅपल, बाथमध्ये सोळा वर्षे ऑर्गन प्लेयर म्हणून काम केले. या कार्यकाळात त्यांना खगोलशास्त्राची गोडी लागली.
१७७२ मध्ये त्यांनी आपली बहीण कॅरोलिन हरशॅलला इंग्लंडला आणले. कॅरोलिनने आपली खगोलशास्त्रातील आवड भावाकडे बोलून दाखवली. त्यानंतर दोघांनी एकत्र काम सुरु केले. १७७३ मध्ये हरशॅल यांनी दुर्बिणी तयार करण्याचे काम सुरू केले. पहिली मोठी दुर्बीण १७७४ मध्ये बनवण्यात आली, जी प्रत्यक्षात १.८ मीटर ग्रेगोरियन रिफ्लेक्टर होती.
पुढे हरशॅल (Sir William Herschel) यांनी संपूर्ण आकाशाचे सखोल सर्वेक्षण केले. त्यांचा उद्देश दुहेरी तारे तपासणे हा होता. १७८२, १७८५ आणि १८२१ मध्ये दुहेरी-तार्‍यांचे कॅटलॉग प्रकाशित केले गेले. त्यात एकूण ८४८ तारे सूचीबद्ध करण्यात आले होते. एका निरीक्षणादरम्यान हरशॅल यांच्या असे लक्षात आले की त्यांनी पाहिलेला आकाशीय पिंड हा तारा नसून एक ग्रह आहे आणि या ग्रहाचे नाव आहे युरेनस.
युरेनसचा शोध लावल्यामुळे हरशॅल भाऊ आणि बहीण तसेच त्यांचे सहाय्यक कॅरोलिन खूप प्रसिद्ध झाले. त्यांनी शोधलेल्या ग्रहाला “जॉर्जियम सीडस” असे नाव द्यायचे होते. पण खगोलशास्त्रीय मंडळींना हे पटले नाही. शेवटी या ग्रहाचे नाव आकाशातील पौराणिक देवता युरेनसच्या नावावरून ठेवण्यात आले. हा शोध लावल्यामुळे जॉर्ज-तृतीय यांनी हरशॅल यांना ‘निर्णायक खगोलशास्त्रज्ञ’ म्हणून नियुक्त केले. भाऊ आणि बहीण दोघांनाही पेन्शन देण्यात आले. रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून त्यांची निवड झाली आणि नवीन दुर्बिणी तयार करण्यासाठी त्यांना अनुदानही देण्यात आले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.