- ऋजुता लुकतुके
आसुस रॉग ८ सीरिज अखेर भारतात लाँच झाली आहे. कन्झ्युमर इलेक्ट्रिक शोमध्ये पहिल्यांदा हा फोन लोकांसमोर आला तेव्हापासून या फोनची चर्चा आहे. रॉग फोन ८ आणि रॉग फोन ८ प्रो असे दोन फोन कंपनीने लाँच केले आहेत. आयफोन प्रमाणे असलेली एजलेस म्हणजे चौकट नसलेली पूर्ण फ्रेम हे या फोनचं वैशिष्ट्य आहे. शिवाय प्रो मॉडेलमध्ये १ टेराबाईट इतक्या स्टोरेजचा फोनही उपलब्ध आहे.
आसुसच्या या आधीच्या फोनच्या तुलनेत या फोनचा लुक, डिझाईन आणि जाडीही स्लिम आहे. ६.७८ इंचांचा डिस्प्ले या फोनमध्ये आहे. युझर इंटरफेस अँड्रॉईड १४ प्रणालीचा आहे. तर फोनला गोरिला काचही बसवण्यात आली आहे.
(हेही वाचा – Prime Minister Modi यांचा गुजरातमध्ये रोड शो, संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्षही उपस्थित)
Going edgeless!
The ROG Phone 8 is dropping on January 8!
Watch it live on ROG YouTube
Save the date! 👉https://t.co/Z3o4wmO3yp#ROGPhone8 #BeyondGaming pic.twitter.com/HURxumInJC— ASUS India (@ASUSIndia) January 3, 2024
या फोनचा प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन आठव्या पिढीचा प्रोसेसर आहे. या फोनची वरची मॉडेल्स १२, १६ तसंच २४ जीबी रॅमची असतील. तर स्टोरेजही २५० जीबी तसंच ५१२ आणि १ टेराबाईटचं असेल. फोनच्या प्रो मॉडेलमध्ये ३ कॅमेरांचा कॅमेरा आयलंड आहे. यात प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सलचा. तर १३ मेगापिक्सलची अल्ट्रा लेन्स आणि ३२ मेगापिक्सलची टेलिफोटो लेन्सही असेल.
फोनची बॅटरी ५५०० एमएएच क्षमतेची आहे. आणि फोनला क्विक चार्जिंग सपोर्टही आहे. या फोनची स्पर्धा थेट आयफोन किंवा सॅमसंग गॅलेक्सी फोनशी असणार आहे. त्यामुळे किंमतही तशीच तगडी म्हणजे ७५००० रुपयांनी सुरू होणारी आहे. तर प्रो मॉडेल ९९,९९० रुपयांपर्यंत पोहोचू शकेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community