आता ऑफीसमध्येही काढू शकता डुलकी; पण आहे ‘ही’ अट

नोकरदार वर्गाला कामाच्या ताणामुळे पुरेशी विश्रांती घेता येत नाही. ही समस्या सर्वच देशांतील नोकरदार वर्गाची आहे. परंतु जापानमध्ये ही समस्या अधिक आहे. कामाचे तास जास्त असल्याने, कर्मचा-यांना पुरेशी विश्रांती मिळत नाही. या समस्येवर तोडगा काढताना, खास नॅप बाॅक्स तयार करण्यात आला आहे. कामाच्या ठिकाणी घटकाभर डुलकी काढून फ्रेश होण्यासाठी हे नॅप बाॅक्स आहेत. टोकियोमधील एका कार्यक्रमात जपानमधील इकोटी आणि कोयजू प्लायवूड काॅर्पोरेशन या फर्निचर सप्लायर्सनी खास नॅप बाॅक्स तयार केला आहे. यामध्ये ज्या कर्मचा-यांची शिफ्ट जास्त वेळ असते, ते झोपू शकतात. पण यासाठी अट आहे की, या बाॅक्समध्ये आडवे नाहीतर उभे झोपावे लागणार आहे.

अपु-या झोपेमुळे अर्थव्यवस्थेला फटका

2016 मध्ये रॅंड काॅर्पोरेशनने याविषयीचे एक विश्लेषण प्रसिद्ध केले होते. कर्मचा-यांना पुरेशी झोप न मिळाल्याने त्याचा अमेरिकन अर्थव्यवस्थेला दरवर्षी 411 अब्ज डाॅलर्सचा फटका बसत असल्याचे, यात म्हटले आहे. यामध्ये वाया जाणा-या कामाच्या तासांचाही समावेश आहे.

( हेही वाचा: तुम्ही सोपा पासवर्ड तर ठेवत नाहीत ना; नाहीतर व्हाल कंगाल )

उभेच राहून झोपावे लागेल

टोकियोमधील एका कार्यक्रमात जपानमधील दोन प्रसिद्ध फर्निचर कंपन्यांनी या खास व्यवस्थेचे डिझाइन सादर केले आहे. जपानमधील इटोकी आणि कोयजू प्यायवूड काॅर्पोरेशन या फर्निचर सप्लायर्सनी खास नॅप बाॅक्स तयार केला आहे. यामध्ये जास्त वेळ शिफ्ट करणारे कर्मचारी झोपू शकतात. मात्र यासाठी अट एवढीच आहे की, त्यांना या बाॅक्समध्ये आडवे न होता उभेच राहून झोपावे लागेल.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here