डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्याचा वन्य जीवांना बसतोय फटका

कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याचा नजीकच्या जैवविविधतेलाही फटका बसला आहे. या भागापासून नजीकच असलेल्या फ्लेमिंगो अभयारण्यातील जैवविविधतेलाही झळ बसली आहे. मुळात डम्पिंग ग्राउंडच्या बाजूलाच पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र सुरु होते. जंगल भागातच डम्पिंग ग्राउंड तयार केल्याने पर्यावरणाचे नुकसान होत आहे. याबाबत पर्यावरणप्रेमी आणि प्राणीप्रेमी खेद व्यक्त करत आहेत. याचा फटका नजीकच्या अभयारण्यातील मुंबईच्या पाहुण्या फ्लेमिंगोनाही बसतो आहे.

( हेही वाचा : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहते भाड्याच्या घरात )

कसा झाला मुंबईतील या जंगलाचा ऱ्हास

2005 साली कांजूरमार्ग येथील अंदाजे 350 हेक्टर जागा जंगल म्हणून घोषित करण्यात आली. मात्र मुंबईतील वाढत्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याची विल्हेवाट लावताना यातील 120 हेक्टर जागा कालांतराने वगळली गेली. 2010 साली या जागेत कांजूरमार्ग घनकचरा विघटन केंद्र उभारले गेले.

या केंद्रात सहा हजार 500 टन कचरा दर दिवसाला विघटन करण्याची क्षमता आहे. परंतु आता दहा हजार टन कचऱ्याचा ढीग डेब्रिज आणि मातीसह टाकला जात असल्याने इथल्या पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल वनशक्ती या पर्यावरणप्रेमी संस्थेचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी चिंता व्यक्त केली आहे.

वन्यजीवांचा अधिवास बिघडवणारी कारणे

  • दुर्गंधी
  • कचऱ्यातील अन्नपदार्थ
  • ढासळत्या हवेच्या गुणवत्तेत गुदमरणरा श्वास

कचऱ्यात कोणाचा अधिवास बिघडतोय

कोल्हे, मुंगुस, वटवाघूळ आणि खार कधी जखमी अवस्थेत सापडतात तर कधी त्यांच्या डम्पिंग ग्राउंडच्या बिघडत्या अधिवासात जीव जातो, अशी माहिती रेस्किंग असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ वेल्फेअरचे संस्थापक आणि ठाणे वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांनी दिली. फ्लेमिंगोसह बगळे, खार, पोपट, घारही स्वतःच्या बचावसाठी धडपडत आहेत. घोरपड, अजगर, रेट स्नेक, घोणस तर कधी मगरीलाही कचऱ्याच्या घाणीचा फटका बसला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here