कोरोनाकाळात डॉक्टरांएवढ्याच परिचारिकांना रुग्णसेवा देताना हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. आज कोरोनाच्या मृत्यूशय्येवरून रुग्णांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर परिचारिकांच्या मूलभूत मागाण्यांकडे सरकारने दुर्लक्ष करता कामा नये. सरकारने कंत्राटीकरण रद्द करावे, अशी मागणी आझाद मैदानात कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तडाख्यातून वाचलेल्या वृद्ध रुग्णाने केली.
‘कठीण काळात मी त्यांना पाठींबा द्यायला आलोय’
लातूरहून दीपक फळसुंदर या (60) या ज्येष्ठ नागरिकाने परिचारिकांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी थेट मुंबई गाठली. आपल्या कठीण काळात 28 दिवस रुग्णसेवा देणाऱ्या परिचारिकांना त्यांनी धन्यवाद दिले. पहिल्या लाटेच्या वेळी दीपक फळसुंदर मुंबईला नोकरीला होते. लॉकडाऊन जाहीर होताच त्यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला. 2020 साली मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दीपक लातूरला पोहोचले ते कोविड घेऊन. लातूर शहरात कोविडची बाधा होणारे ते पहिलेच रुग्ण होते. वयोमानामुळे उपचारात असंख्य अडथळे येत होते, अखेर परिचारिकांच्या सुश्रुशेमुळेच मला नवे जीवनदान मिळाले. आता त्यांच्या कठीण काळात मी त्यांना पाठींबा द्यायला आलोय, अशी माहिती दीपक फळसुंदर यांनी दिली.
नव्या परिचारिकांची कंत्राटीपद्धतीने नियुक्ती नको
कंत्राटीपद्धतीने परिचारिका नियुक्ती केल्यास रुग्णसेवेचा दर्जा ढासळेल. या मार्गाने भ्रष्टाचार आणि गुंडागर्दीला वाव मिळेल, अशी भीती दीपक फळसुंदर यांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community