पुणे रेल्वे स्टेशनवर बाॅम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून 1 आणि 2 प्लॅटफाॅर्म पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. बीडीडीएसचे पथक सध्या घटनास्थळी दाखलं झाले आहे. तसेच, पुणे रेल्वेस्थानकातील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली आहे.
रेल्वे परिसरात खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानकावर जिलेटीनच्या तीन कांड्या पोलिसांना सापडल्या. सध्या या जिलेटीनच्या तिनही कांड्या निकामी करण्यात आल्या आहेत. या संपूर्ण घटनेची चौकशी सुरु असल्याची माहिती पुणे रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या घटनेनंतर पुणे शहर आणि रेल्वेस्थानक परिसरात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
( हेही वाचा :महागाईची लाट; आठ वर्षांचा उच्चांक, सगळ्याच वस्तूंच्या किंमती वाढल्या )
पोलीस आयुक्तांकडून रेल्वे स्थानकाची पाहणी
बाॅम्ब शोधक आणि रेल्वे पथक पुणे रेल्वे स्थानकावर दाखल झाले आहे. पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ताही घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी देखील या घटनेची पाहणी केली आहे. माध्यमांशी बोलताना, अमिताभ गुप्ता म्हणाले की, सकाळी 10.30 ला रेल्वेस्थानकावर संशयास्पद वस्तू सापडली. प्राथमिक माहितीनुसार, मिळालेली वस्तू ही जिलेटीन नाही, पण बीडीडीएसची टीम तपास करत आहे, पुढील तपास सुरु असल्याचे गुप्ता यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community