Atal Bihari Vajpayee : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवन प्रवास

690
Atal Bihari Vajpayee : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवन प्रवास
Atal Bihari Vajpayee : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवन प्रवास

अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) म्हणजे राजकारणातला देव माणूस… वाजपेयी हे केवळ राजकीय नेते नव्हते तर ते हळव्या मनाचे कवी होते आणि एक जबरदस्त वक्ता होते. भारतीय जनता पक्षाच्या सुरुवातीच्या काळात वाजपेयी आणि अडवाणींचं योगदान कुणीही विसरु शकणार नाही. वाजपेयी तीन वेळा भारताचे पंतप्रधान होते. ते प्रथम १६ मे ते १ जून १९९६, पुन्हा १९९८ मध्ये आणि मग पुन्हा १९ मार्च १९९९ ते २२ मे २००४ पर्यंत भारताचे पंतप्रधान होते.

राष्ट्रधर्म, पांचजन्य आणि वीर अर्जुन यांसारख्या राष्ट्रीय भावनांनी ओतप्रोत अनेक वृत्तपत्रे आणि मासिकांचे त्यांनी दीर्घकाळ संपादन केले. अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील लष्कर येथे झाला. त्यांचे वडील पंडित कृष्ण बिहारी वाजपेयी शिक्षक होते आणि आई ‘कृष्णा देवी’ गृहिणी होत्या.

(हेही वाचा-JN.1 update : खबरदारी घ्या! JN.1चे ठाण्यात एकाच दिवसात पाच रुग्ण; देशातील आकडेवारी काय जाणून घ्या)

वाजपेयी बालपणापासून हुशार आणि अंतर्मुख होणारे व्यक्तिमत्व होते. वाजपेयींचे व्हिक्टोरिया कॉलेजमधून बीएचे शिक्षण घेतले. विद्यार्थिदशेपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक झाले. पुढे कानपूरच्या डीएव्ही कॉलेजमधून राज्यशास्त्र विषयात एमएची परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण केली. त्या त्यांनी कानपूरमधूनच एलएलबीचे शिक्षण घेतले.

वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) हे जनसंघाचे देखील संस्थापक होते. त्यानंतर जनता पार्टीचे नेतृत्व देखील त्यांनी केले. पुढे भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेत देखील त्यांचा सिंहाचा वाटा होता. पंतप्रधान म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. १९९८ मध्ये पेखरण येथे अणू चाचण्या करुन त्यांच्या नेतृत्वाखाली भारत अणूऊर्जा संपन्न देश झाला. कारगीलचे युद्ध देखील आपण त्यांच्याच नेतृत्वाखाली जिंकलो. देशाच्या सुरक्षेसाठी वाजपेयींनी खूप प्रयत्न केले होते. त्याचबरोबर अनेक जनकल्याणकारी योजना राबवून त्यांनी लोकांचं जीवन सुसह्य केलं.

स्वर्णिम चतुर्भुज हा प्रकल्प भारताच्या चारही कोपऱ्यांना रस्त्याने जोडण्यासाठी सुरू करण्यात आला. या अंतर्गत दिल्ली, कलकत्ता, चेन्नई आणि मुंबई महामार्गाने जोडले गेले. २००५ मध्ये त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला आणि १६ ऑगस्ट २०१८ रोजी ते हे जग सोडून गेले.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.