Atal Setu News : ट्रान्स-हार्बर सागरी महामार्गाविषयी १० आश्चर्यकारक गोष्टी

अटल सागरी सेतू शुक्रवारपासून वाहतुकीला खुला होत आहे. 

1529
Atal Setu आजपासून खुला, आता २ तासांच्या प्रवासाला लागणार फक्त २० मिनिटं
  • ऋजुता लुकतुके

शिवडी ते न्हावा-शिवापर्यंत हा भाग समुद्र मार्गाने जोडणारा अटल सागरी सेतू शुक्रवारपासून वाहतुकीसाठी सुरू होत आहे. १७,८४० कोटी रुपये खर्चून उभा राहिलेला हा सागरी मार्ग हा भारतातील सगळ्यात लांब पूल आहे. त्याविषयीच्या १० आश्चर्यकारक गोष्टी समजून घेऊया… (Atal Setu News)

१. केंद्र सरकारने अगदी सुरुवातीपासून देशभरात रस्ते बांधणी आणि पायाभूत सुविधा उभारणी यांना महत्त्व दिलं आहे. त्यानुसार, शहरात दळणवळण अद्ययावत असावं यासाठी दक्षिण मुंबईला नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाशी जोडणाऱ्या सागरी सेतूची योजना आखण्यात आली. २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीच या उपक्रमाची पायाभरणी केली होती. आता हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. आणि याचं नाव अटल सागरी सेतू (Atal Sea Bridge) असं देण्यात आलं आहे. (Atal Setu News)

२. अटल सागरी सेतूवर (Atal Sea Bridge) ६ मार्गिका असलेला २१.८ किलोमीटर लांबीचा हा सागरी पूल आहे. यातील १६.५ किमी हे समुद्रावरून तर ५.३ किमी हे जमिनीवरून जातात. (Atal Setu News)

(हेही वाचा – Narendra Modi: भारतीय युवा राजकारणात आल्यास घराणेशाहीतील राजकारण संपुष्टात येईल, पंतप्रधानांचे तरुणांना आवाहन)

३. या मार्गामुळे मुंबईचं दळणवळण चांगलंच सुधारणार आहे. मुंबईतील विमानतळ ते नवी मुंबई प्रस्तावित विमानतळ यांच्यातील अंतर यामुळे कमी होईल. तसंच दक्षिण मुंबई ते पुणे, गोवा आणि अख्ख्या दक्षिण भारतात जाण्याचा कालावधीही कमी होणार आहे. शिवाय जवाहर बंदराबरोबरच बंदराकडे जाणारं दळणवळणही सुधारणार आहे. (Atal Setu News)

४. प्रवासी कारसाठी एकदा हा पूल ओलांडण्यासाठी २५० रुपये इतका टोल आकारण्यात येणार आहे. तर इतर गाड्यांसाठी वेगवेगळे टोल असतील. (Atal Setu News)

५. दक्षिण मुंबईतील शिवडी ते रायगड जिल्ह्यातील पनवेल हे अंतर पंधरा किलोमीटरनी कमी होणार आहे. आणि त्यामुळे या दोन शहरांतील प्रवासाचा कालावधी २ तासांवरून थेट १५ ते २० मिनिटांवर येईल. (Atal Setu News)

६. अटल सागरी सेतूला (Atal Sea Bridge) अभियांत्रिकी अविष्कार मानलं जात आहे. कारण, या सेतूवरील दिवेही वेगळ्या पद्धतीने उभारण्यात आले आहेत. दिव्यांची प्रखरता वातावरणानुसार बदलेल. आणि त्यातून सभोवतालच्या वातावरणाची रंगत आणखी वाढेल. (Atal Setu News)

७. जागतिक स्तरावर अभियांत्रिकी अविष्कार समजला गेलेला आयफेल टॉवर (Eiffel Tower) उभारण्यासाठी जितकं पोलाद लागलं, त्यापेक्षा १७ पट जास्त पोलाद सागरी सेतू उभारण्यासाठी वापरलं गेलं आहे. (Atal Setu News)

(हेही वाचा – BMC : पवार यांची बदली, सोपवली सहआयुक्त (विशेष) ची जबाबदारी)

८. अभियांत्रिकी बरोबरच पर्यावरणाला कमीत कमी त्रास होईल असं या पूलाचं बांधकाम आहे. कारण, समुद्रातील वनस्पती आणि जीवांवरही अशा बांधकामांचा परिणाम होत असतो. पूलावरील वाहतुकीमुळे तयार होणाऱ्या स्पंदनांमुळे समुद्रातील पाण्यात कंपनं जाणवतात. आणि तिथले जलचर तसंच वनस्पती यांच्यावर त्याचा परिणाम होतो. हे जीव असुरक्षित होतात. पण, पूलाचं बांधकाम अशा विशिष्टं पद्धतीने केलं आहे की, अशी स्पंदनं कमीत कमी जाणवावीत. त्यामुळे सागरी जीवांना कमीतकमी त्रास व्हावा. तसंच दिवेही अशा रीतीने बसवले गेले आहेत की, मासे आणि इतर जीवांना त्रास होऊ नये. (Atal Setu News)

९. पूलाच्या उभारणीत पर्यावरणाची योग्य काळजी घेतली गेली असल्याचं पत्र बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनेही एमएमआरडीएला दिलं आहे. (Atal Setu News)

१०. तसंच इथं रहादारीच्या व्यवस्थापनासाठी विशेष यंत्रणा बसवण्यात आली आहे. यामुळे धुकं, दृश्यमानता आणि वेग मर्यादा याचा अंदाज नियंत्रण कक्षाला सगळ्यात आधी येईल. (Atal Setu News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.