नालासोपाऱ्यात नक्षलवाद्याला अटक, १५ लाखांचे होते बक्षीस

दहशतवादी विरोधी पथक(एटीएस)ने नालासोपारा येथून एका नक्षलवाद्याला रविवारी अटक केली आहे. झारखंड राज्यातील हजारीबाग येथे राहणाऱ्या या नक्षलवाद्यावर तब्बल १५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता या नक्षलवाद्याला एटीएसने आपल्या ताब्यात घेतले आहे.

२००४ पासून नक्षली कारवायांमध्ये सक्रीय

कारू हुलाश यादव (४५) असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. कारु यादव हा झारखंड राज्यातील हजारीबाग कटकम सांडी येथे राहणारा असून, केंद्र सरकारने बंदी घातलेल्या ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ (माओ) या संघटनेचा सदस्य आहे. २००४ पासून कारु यादव हा नक्षली कारवायांमध्ये सक्रीय असून सरकारने त्याला पकडून देण्यासाठी १५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. मुंबई शहरापासून जवळच असलेल्या नालासोपारा येथे तो स्वतःवर औषधोपचार करण्यासाठी आला होता व नालासोपारा येथील धानवी, रामनगर या ठिकाणी तो लपून बसला होता.

(हेही वाचाः मुंबईतील झवेरी बाजारात ईडीची धाड, 92 किलो सोन्यासह 340 किलो चांदी जप्त)

तपासाला सुरुवात

कारू हा नक्षलवादी नालासोपारा येथे लपून बसला असल्याची माहिती ठाणे दहशतवाद विरोधी पथकाला मिळताच दहशतवाद विरोधी पथकाने त्याला रविवारी सकाळी अटक केली आहे. त्याच्या अटकेची माहिती झारखंड पोलिसांना देण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती एटीएसने दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here