गुजरात निवडणुकीपूर्वी 13 जिल्ह्यांत 100 हून अधिक ठिकाणी ATS ची छापेमारी

गुजरात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून 1 आणि 5 डिसेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अशातच आता दहशतवाद विरोधी पथकाने कारवायांचा सपाटा सुरु केला आहे. एटीएसने गुजरातमधील 13 जिल्ह्यांमधील 100 हून अधिक ठिकाणी छापेमारी केली आहे. शुक्रवारी रात्रीपासून छापेमारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

देशविरोधी कारवाया रोखण्यासाठी गुजरात एटीएसने मोठी कारवाई केली आहे. गुजरात एटीएसने 11-12 नोव्हेंबरच्या रात्री राज्यातील 13 जिल्ह्यांतील 100 ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत गुजरात एटीएसने 65 जणांना अटकही केली आहे. अहमदाबाद, भरुच, भावनगर आणि जामनगर येथे छापे टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. बनावट बिलांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची हेराफेरी केल्याप्रकरणी एजन्सीने ही छापेमारी केली आहे.

( हेही वाचा: मी कोण आहे माहिती आहे का? म्हणत.. PMPML बसच्या ड्रायव्हरला तरुणाकडून मारहाण )

मिठाई, रिअल इस्टेट, फायनान्सशी संबंधित अनेक गटांवर कारवाई

मिठाई, रिअल इस्टेट आणि फायनान्सशी संबंधित अनेक गटांवर आयकर विभागाने कारवाई केली आहे. या छापेमारीमुळे रिअल इस्टेट व्यवसायात खळबळ उडाली आहे. यासोबतच फायनान्स ब्रोकर्समध्येही भीतीचे वातावरण आहे. एटीएसने केलेल्या छापेमारीत मोठी बातमी मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

150 ठिकाणी छापेमारी 

मिळालेल्या रिपोर्टनुसार, गुजरात, एटीएस, जीएसटी विभागासोबत संयुक्त कारवाई केली आहे. आतापर्यंत सुरत, अहमदाबाद, जामनगर, भरुच आणि भावनगर या जिल्ह्यांमध्ये 150 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. करचोरी आणि पैशांच्या व्यवहारासाठी आंतरराष्ट्रीय मार्गांवर हे छापे टाकण्यात येत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here