मालेगाव बॉम्बस्फोट : हिंदुत्ववाद्यांविरोधात  कारस्थान! साक्षीदाराचा धक्कादायक खुलासा

132

महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या साक्षीदाराने विशेष एनआयएच्या न्यायालयात खळबळजनक खुलासा केला आहे. तत्कालिन एटीस अधिकाऱ्यांच्या दबावात योगी आदित्यनाथ यांच्यासह संघ परिवारातील चौघांची नावे घेतल्याचे या प्रकरणातील एका साक्षीदाराने सांगितले. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाल्याचे चित्र आहे. हे प्रकरणहिंदुत्ववाद्यांविरोधात कारस्थान होते का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

हिंदुत्ववाद्यांना जाणीवपूर्वक गोवण्याचा प्रयत्न

विशेष एनआयए न्यायालयात सध्या मालेगावात 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील साक्षीदारांची तपासणी करण्यात येत आहे. हा स्फोट झाल्यानंतर त्याचा तपास करणाऱ्या दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी आपल्यावर दबाव टाकला होता. सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असणारे योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असणाऱ्या चौघांची नावे या प्रकऱणात घ्यावीत, यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आला होता, असा दावा साक्षीदाराने या प्रकरणी आपली साक्ष फिरवताना केला आहे. योगींसह साक्षीदाराने घेतलेल्या नावांमध्ये इंद्रेश कुमार आणि असीमानंद यांच्या नावांचा समावेश असल्याची माहिती आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ आणि संघाच्या स्वयंसेवकांना जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

( हेही वाचा :अजित पवारांनी आमदारांना दिले शिस्तीचे धडे! म्हणाले, मुख्यमंत्र्यांची तरी खूर्ची सोडा! )

साक्षीदाराने साक्ष फिरवली

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत किमान 13 साक्षीदारांनी आपल्या मूळ साक्षीवरून घूमजाव केलं आहे. गेल्या आठवड्यातही एका साक्षीदारानं आपली साक्ष फिरवली होती. बॉम्बस्फोट झाल्याच्या घटनेनंतर सुरुवातीला या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे देण्यात आला होता. त्यानंतर आतापर्यंत नोंदवलेल्या साक्षींची विशेष एनआयए न्यायालयामार्फत तपासणी करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.