आसाम रायफल्सच्या ताफ्यावरील हल्ल्यात चीनचा हात! वाचा…

आसाम राज्यात कार्यरत असलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मी या दहशतवादी संघटनेचा मणिपूरमधील आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात हात असल्याचे मानले जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सरकार आणि देशाच्या गुप्तचर यंत्रणा याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या मणिपूरमध्ये सहा पेक्षा अधिक दहशतवादी संघटना सक्रिय असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादाच्या काही नेत्यांची आणि संघटनांचीही केंद्रे म्यानमारमध्ये आहेत. विशेष म्हणजे त्यांचा चीनशीही संबंध असल्याचे समोर येत आहे. चीनच्या इशाऱ्यावर हे हल्ले करण्यात आले, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तपास यंत्रणा याचा तपास घेत आहे. 13 नोव्हेंबर रोजी झालेल्या या हल्ल्यात लष्कराचे कर्नल विप्लब त्रिपाठी आणि त्यांच्या कुटुंबासह सात जणांचा मृत्यू झाला होता.

चीनचा सुरूवातीपासूनच पाठिंबा

पीपल्स लिबरेशन आर्मी 1978 मध्ये अस्तित्वात आली आहे. सुरुवातीपासून त्याचे चीनशी संबंध असून त्यांचा पाठिंबा आहे. सहभागी दहशतवादी चीन-तिबेट भाषा बोलतात आणि ते चीनच्या जवळचे मानले जातात. ही संघटना याआधीही हल्ले करत आली आहे, मात्र 13 नोव्हेंबरचा हल्ला हा सर्वात घातक मानला जात आहे. मणिपूरमधील अनेक भागात ही संघटना सक्रिय असून साधारण 400 दहशतवादी या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. मणिपूरला वेगळा देश बनवण्याची त्यांची मागणी प्रमुख आहे.

(हेही वाचा – कोकणवासियांची विमानाला पसंती वाढली! बुकिंग फुल्ल…)

जाणून घ्या, पीपल्स लिबरेशन आर्मी

  • पीपल्स लिबरेशन आर्मी सुरुवातीपासूनच भारतीय लष्कर, निमलष्करी दल आणि पोलिसांना लक्ष्य करत आहे.
  • 1990 च्या सुमारास राज्य पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला न करण्याची घोषणा केली होती.
  • 1982 मध्ये पीएलए प्रमुख थोडम कुंजबेहारी यांची हत्या झाली. एन बिशेश्वर सिंग यांना 1981 मध्ये अटक करण्यात आली होती. या दोन कारणांमुळे ही संघटना कमकुवत झाली.
  • 1989 मध्ये, संघटनेने एक राजकीय आघाडी स्थापन केली, ज्याचे नाव होते क्रांतिकारी पीपल्स फ्रंट असे होते.
  • राज्यातील सर्व जमातींच्या हितासाठी लढत असल्याचा दावा दहशतवादी संघटनेने केला आहे. त्याचे दहशतवादी आसाम, त्रिपुरा, नागालँड, मेघालय तसेच मिझोराममध्ये सक्रिय आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here