डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्यावर हल्लेखोरांना कठोर शिक्षा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. या हल्लेखोरांची ओळख पटली आहे. लवकरच या आरोपींना न्यायालय शिक्षा सुनावणार आहे.
गृहमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता
दिलीप वळसे पाटील यांनी 20 मार्च रोजी नाशिक जिल्ह्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सध्या देशाची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. कुणालाही आपले स्वतंत्र मत मांडता येत नाही. विरोधी विचारसरणी संपवली जात आहेत. तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला, मात्र या प्रकरणात साक्षीदाराने आरोपीला ओळखले असल्याने आरोपींना शिक्षेचा मार्ग सुकर झाला आहे.
(हेही वाचा – उपायुक्त सौरभ त्रिपाठींच्या नोकराला ‘या’ प्रकरणात झाली अटक!)
पुण्यात झाला खून
20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांची दोन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सचिन अंदुरे, शरद काळसकर, वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना अटक केली आहे.
कोण आहेत दाभोळकर?
बाबा आढाव यांच्या “एक गाव- एक विहीर” या चळवळीत नरेंद्र दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या इ.स. १९८३ साली स्थापन झालेल्या “अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन संमिती”मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर इ.स. १९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी “महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती” स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या “साधना” या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर २००६ पासून संपादक होते.
Join Our WhatsApp Community