रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी येथे लागतो पासपोर्ट आणि व्हिसा!

132

भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे आणि आशियातील दुसरे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतात एकूण ८३३८ रेल्वे स्थानके आहेत. पण तुम्हाला एक गोष्ट माहित नसेल ती म्हणजे, देशात असे एक रेल्वे स्टेशन आहे, जिथे तुम्हाला फ्लाइटप्रमाणे व्हिसा आणि पासपोर्टची गरज लागते. जर कोणी चुकून व्हिसाशिवाय या स्टेशनवर गेले तर त्याला तुरुंगात जावे लागू शकते. ही अतिश्योक्ती वाटत असली तरी हे खरे आहे.

जाणून घ्या, कोणते आहे ते स्थानक

या रेल्वे स्टेशनचे नाव आहे अटारी. आता या रेल्वे स्टेशनला अटारी श्याम सिंह स्टेशन या नावाने ओळखले जाते. येथे जाण्यासाठी तुमच्याकडे पाकिस्तानचा व्हिसा असणे अनिवार्य करण्यात आले आहे. येथे कायम गुप्तचर आणि संरक्षण यंत्रणांचा २४ तास कडेकोट पहारा असतो. तसेच या स्टेशनवर व्हिसाशिवाय पोहोचणाऱ्या नागरिकावर गुन्हा दाखल केला जातो. यात जामीन मिळणे खूप अवघड असते.

(हेही वाचा – बेस्टच्या आगारात अधिकार्‍यांची मनमानी; ऐकूनच घेई ना कोणी!)

३७० हटवल्यापासून समझौता एक्स्प्रेस बंद

देशातील सर्वात व्हीव्हीआयपी ट्रेन ‘समझौता एक्स्प्रेस’ या रेल्वे स्थानकावरून रवाना होत असे. पण काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून समझौता एक्स्प्रेस बंद आहे. हे भारतातील पहिले रेल्वे स्थानक आहे जिथे रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी सीमाशुल्क विभागासह ट्रेनमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांकडून परवानगी घेतली जाते. या रेल्वे स्थानकावरून तिकीट खरेदी करणाऱ्या सर्व प्रवाशांचा पासपोर्ट क्रमांक लिहिला जातो, त्यानंतर त्यांना कन्फर्म सीट दिली जाते.

पंजाबमधील भारतातील शेवटचे रेल्वे स्टेशन ‘अटारी’ आहे. एका बाजूला भारताचे अमृतसर आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचे लाहोर आहे. समझौता एक्स्प्रेस बंद झाल्यानंतरही येथे काही कामे सुरू असून आजही लोकांना येथे येऊ दिले जात नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.