येशूचे रक्त प्या, पूजा करा म्हणत धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न; आळंदीत गुन्हा दाखल

आळंदीत धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करताना तुम्ही तुमचा धर्म सोडून द्या आणि येशूचे रक्त प्या, पूजा करा असे सांगण्यात आले असे तक्रारीत म्हटले आहे. येशूचे रक्त म्हणून द्राक्षाचे पाणी दिल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. धर्मपरिवर्तन करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आळंदीमध्ये ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

( हेही वाचा : संजय राऊतांविरोधात अजामीनपात्र वाॅरंट जारी; पुढील सुनावणी 24 जानेवारीला )

धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न

तक्रारदार पाच वर्षांपासून स्मशानभूमीत काम करतात त्यांच्या घरात ३ जण शिरले आणि त्यांनी तक्रारदारासहित आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न केला. तुमचे सर्व आजार ख्रिश्चन धर्माच्या प्राथनेने बरे करतो असेही सांगण्यात आले. घरातील सर्व देव टाकून घ्या त्यानंतर तुमच्या जीवनातील सर्व सगळ्या आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी येशू ख्रिस्तांची पूजा करण्यास सांगितले.

१ जानेवारीच्या रात्री हा संतापजनक प्रकार घडला आहे. दरम्यान या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये महिला काही प्रार्थना म्हणून दाखवते. तसेच छोट्या ग्लासांमध्ये येशूचे रक्त आहे अशी संबंधित महिला या व्हिडिओमध्ये सांगत आहे. या प्रकारामुळे परिसरातील लोकांनी संताप व्यक्त केला आहे. सर्व पुराव्यांच्या अभ्यासानंतर आरोपींवर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here