ऋजुता लुकतुके
ऑडीची ए३ कार (Audi A3 2023) ही खूप साऱ्या प्रिमिअम सुविधा चार दारं असलेल्या कॉम्पॅक्ट कारमध्ये भरलेली आहेत, असं या गाडीचं वर्णन ती अमेरिकेत लाँच झाली तेव्हा करण्यात आलं होतं. म्हणूनच ही कार ऑडी ब्रँडची किफायतशीर सेदान कार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रिमिअम कारमधील एंट्री स्तरावरील कारमध्ये ऑडी ए३ चा समावेश होत आहे.
या कारला एलईडी हेडलाईट्स तर आहेतच. शिवाय गाडीतील इंटिरियरमध्येही एलईडी स्क्रीन आणि एलईडी दिव्यांचा वापर करण्यात आली आहे. गाडीत आतमध्ये वायरलेज स्मार्टफोन चार्जिंग पॅडही देण्यात आल आहे. ही गाडी प्रिमिअम आणि प्रिमिअम प्लस अशा दोन व्हेरिंयंटमध्ये येते. यात प्रिमिअम प्लस प्रकारात क्रूझ कंट्रोल, लेन किपिंग असिस्टंन्स, मेमरी सीट आणि चावीशिवाय दार उघडण्याच्या प्रिमिअम सुविधा यात आहेत. बाहेरून ही गाडी कशी दिसते यासाठी जानेवारी २०२३ मध्ये या गाडीचं टेस्ट ड्राईव्ह सुरू असताना बाहेर आलेला फोटो बघा.
NEWS: The new 2023 Audi A3 has been spotted in sporty S3 guise…>> https://t.co/h9Ekgz1tVI pic.twitter.com/Mg8wPRNCYm
— Auto Express (@AutoExpress) January 28, 2023
या गाडीचं इंजिन २०१ हॉर्सपॉवरचं २.० लीटर, ४ सिलिंडर असलेलं ४० व्होल्ट हायब्रिड इंजिन आहे. गाडीत स्टँडर्ड ७ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. ही गाडी शून्य ते ६० माईल्सचा वेग सहा सेकंदात गाठू शकते. तर प्लेफूल हँडलिंग फिचर कंपनीने या कारमध्येही कायम ठेवलं आहे. गाडीच्या आत १०.१ इंचांचा इन्फोटेन्मेंट डिस्प्ले आहे.
या गाडीची स्पर्धा बीएमडब्ल्यू टू सिरीज ग्रॅन कूप आणि ॲक्युरा इंटिग्रा या गाड्यांशी असेल. भारतात या गाडीची किंमत ३५ लाखांपासून सुरू होईल.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community