- ऋजुता लुकतुके
ऑडी (Audi Q8 2024) या जगप्रसिद्ध ब्रँडच्या क्यू सीरिजची ही आठवी कार आहे. इंग्रजीतील 8 हे अक्षर इन्फिनिटी म्हणजे अनंत शक्यतांकडे घेऊन जाणारं आहे. तसंच काहीसं ऑडीच्या क्यू८ (Audi Q8 2024) २०२४ गाडीचं आहे. म्हणजे ऑडी क्यू ८ (Audi Q8 2024) या फेसलिफ्टने कंपनीला भारतात मोठं यश मिळवून दिलं आहे. १.१८ कोटी रुपयांची किंमत असूनही भारतात उत्तरोत्तर क्यू सीरिजने विक्रीचे नवनवे उच्चांक सर केले आहेत. आता इलेक्ट्रिक वाहनाच्या क्षेत्रातही अग्रेसर असलेली गाडी कंपनीने लाँच केली आहे. (Audi Q8 2024)
(हेही वाचा- T20 World Cup, SA vs Nep : नेपाळने जेव्हा दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी जेरीला आणलं….)
आताही फेसलिफ्ट दिलेली गाडी असली तरी क्यू सीरिजमध्ये फारसे बदल कंपनीने केलेले नाहीत. फक्त क्यू८ ची इलेक्ट्रिक बहीण त्यांनी इ-ट्रॉन नावाने बाजारात आणली आहे. (Audi Q8 2024)
एरवी क्यू८ २०२४ चं इंजिन पेट्रोल इंजिन आहे. आणि या इंजिनातून ३४० अश्वशक्ती इतकी शक्ती निर्माण होते. तर गाडीत ८ स्पीड गिअर बॉक्स आहे. जो ऑटोमॅटिक श्रेणीतही उपलब्ध आहे. भारतात सध्या लोकप्रिय असलेल्या एसयुव्ही श्रेणीतील ही गाडी आहे. ० ते १०० किमींचा वेग ही गाडी ५.६ सेकंदांत गाठू शकते. (Audi Q8 2024)
The new 2024 Audi Q8 refresh. For those who demand more.
-Enhanced exterior design
-Laser light technology
-Standard Individual Contour Valcona leather on Prestige Package
-Remote Park Assist Plus
-New Sakhir GoldExperience the new 2024 Audi Q8 at Prestige Audi in Denver, CO. pic.twitter.com/VW8tOwiMId
— Prestige Imports (@Prestige_CO) March 14, 2024
आधीच्या क्यू७ (Audi Q8 2024) गाडीच्या तुलनेत क्यू८ च्या इंटिरिअरमध्ये फारसे बदल केलेले नाहीत. पण, नवीन गाडी वूड (लाकडी लूक), ॲॅल्युमिनिअम आणि कार्बन फायबर अशा तीन प्रकारच्या इंटिरिअरमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही बुकिंग करताना आपली आवड सांगून त्याप्रमाणे इंटिरिअर बनवून घेऊ शकता. क्यू सीरिजचं वैशिष्ट्य म्हणजे चालकाची सीट ही विमानाच्या कॉकपिटसारखी दिसते. समोर डिस्प्लेवर वेगवेगळ्या सूचना येत असतात. आणि अनेक सुविधा या कळ दाबली की उपलब्ध होतात. (Audi Q8 2024)
(हेही वाचा- G7: पंतप्रधान मोदी – मेलोनींमध्ये द्विपक्षीय चर्चा; चर्चेचा नेमका विषय काय?)
चालकाची सुरक्षा आणि सुविधा यासाठी हे महत्त्वाचं आहे. तशीच सुविधा नवीन गाडीतही आहे. गाडीत ६०५ लीटरची बूटस्पेस आहे. आणि अत्याधुनिक म्युझिक सिस्टिम आहे. गाडीच्या सीटही व्हेंटिलेटेड असून त्यात मसाजही शक्य होतो. अशा या ‘लोडेड’ गाडीची किंमत १.१७ कोटी रुपयांपासून सुरू होते. (Audi Q8 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community