काही महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या होत्या. त्यावरुन खूप मोठे राजकारण झाले होते. या प्रकरणाचा सुगावा शेवटपर्यंत लागलाच नाही. खरे-खोटे अजूनही गुलदस्त्यात आहे. परंतु याच घटनेच्या आधारावर आता स्टोरीटेल मराठीवर ‘मर्डर केस सीजन २’ ही ऑडिओ सिरीज प्रदर्शित झाली आहे.
( हेही वाचा : तुम्हाला माहिती आहे का? इस्रायलमध्ये मराठी बोलणारे पुष्कळ लोक राहतात…)
स्टोरीटेल हे ऑडिओ बुक्सचे ऍप आहे. यावर अनेक पुस्तके ऐकता येतात. त्याचबरोबर स्टोरीटेल ओरोजिलन्स या श्रेणीमध्ये नव्याने लिहिलेल्या कथा/सिरीज देखील अनुभवता येतात. आता सत्य घटनेवर आधारित काल्पनिक सिरीज ‘मर्डर केस सीजन २’ प्रदर्शित झालेली आहे आणि रसिकांचा भरघोस प्रतिसादही लाभत आहे.
क्राईम थ्रिलरचा आस्वाद घ्या
जयेश मेस्त्री आणि श्रीपाद जोशी हे या सिरीजचे लेखक असून अभिनेता अस्ताद काळे यांनी या सिरीजला आपला दमदार आवाज दिलेला आहे. मुंबईच्या प्रसिद्ध उद्योजकाच्या घराबाहेर जिलेटीनच्या कांड्या सापडतात आणि मग पुढे काय होतं? त्या जिलेटीनच्या कांड्या दहशतवादी कारवायांसाठी वापरल्या गेल्या की त्यामागे वेगळाच हेतू होता? याचा उलगडा करण्यासाठी तुम्हाला ही सिरीज ऐकावी लागणार आहे.
तुम्ही https://www.storytel.com/in/en/series/56323-Murder-Case लिंकवर क्लिक करुन या क्राईम थ्रिलरचा आस्वाद घेऊ शकता. महत्वाचं म्हणजे गाजलेलं पात्र, मराठमोळा शेरलॉक इन्स्पेक्टर अभिमन्यू प्रधान पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आला आहे. मर्डर केस सीजन १, चेकमेट, वाड्याचं रहस्य अशा कथांमधून इन्स्पेक्टर अभिमन्यू प्रधान सर्वपरिचित झालेला आहे.
Join Our WhatsApp Community