वीर सावरकर साहित्य अभ्यासक आणि जगप्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. विक्रम संपत यांनी वीर सावरकर यांच्यावर २ खंडात चरित्र लिहिले आहे. त्यांची जगभरात चर्चा सुरु आहे. असे असताना कथित इतिहासकार ऑड्रे ट्रुश्के यांनी डॉ. संपत यांच्यावर ही पुस्तके लिहिताना त्यांनी माहिती चोरली आहे, त्यामध्ये संदर्भ दिला नाही, असा आरोप करत डॉ. संपत यांची बदनामी करणारे पाच ट्विट केले. हे सगळे ट्विट काढून टाकण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने ट्विटरला दिला आहे.
ऑड्रे ट्रुश्के न्यायालयात गैरहजर
या प्रसंगी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित बन्सल यांच्या खंडपीठाने निरीक्षण केले की, हिंदूफोबिक प्रोफेसर ऑड्रे ट्रुशके यांनी केलेले ट्विट हे बदनामीकारक होते आणि ट्विटरला डॉ. संपत यांच्या विरोधात पोस्ट केलेले आणखी पाच ट्विट काढून टाकावेत. न्यायालयाने आदेश देऊनही अशा प्रकारे बदनामी करणारे ट्विट करण्यात आले आहेत. ट्रुशके या न्यायालयातही हजर राहिल्या नाहीत, असे नमूद करत न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 28 जुलैपर्यंत स्थगित केली. डॉ. विक्रम संपत यांनी ऑड्रे ट्रुशके यांच्या विरोधात याचिका दाखल केली.
काय आहे प्रकरण?
कथित इतिहास संशोधक ऑड्रे ट्रुशके, अनन्या चक्रवर्ती आणि रोहित चोप्रा या अमेरिकेतील विद्यापीठांमधील इतिहास अभ्यासकांनी डॉ. विक्रम संपतच्या विरोधात साहित्याच्या चोरीचा आरोप केला. त्यांच्या विरोधात रॉयल हिस्टोरिकल सोसायटी, यूके यांना 11 फेब्रुवारी 2022 रोजी पत्र लिहिले. ट्रुशके यांच्याकडून डॉ. संपत यांची बदनामी होत होती. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने ऑड्रे ट्रुशके यांना 48 तासांच्या कालावधीत विक्रम संपत यांच्याविरोधात केलेले बदनामीकारक ट्विट काढून टाकण्याचे आदेश दिले.
Join Our WhatsApp Community