छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणारे पर्यटक लक्षात घेऊन, मध्य रेल्वेने या स्थानकात ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) मॅजिक मिरर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता लवकरच स्क्रीनसमोर उभे राहून, प्रत्यक्ष आभासी जग अनुभवता येणार आहे. यामुळे पर्यटकांची करमणूक होणार आहे.
आभासी जगाचा अनुभव
सीएसएमटी स्थानकावर उतरणारे प्रवासी आणि इमारत पाहण्यासाठी येणा-या पर्यटकांना प्रत्यक्ष आभासी जग अनुभवता येणार आहे. या कामासाठी एका कंपनीला पाच वर्षांचे कंत्राटही दिले आहे. यावर काही जाहिरातीही प्रदर्शित केल्या जातील. पाच वर्षांसाठी रेल्वेला 50 लाख रुपये महसूल मिळेल, असे मध्य रेल्वेतील वरिष्ठ अधिका-याने सांगितले. सीएसएमटी स्थानकाच्या फलाट क्रमांक 11 आणि 12 येथे करमणुकीसाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
ऑगमेटेंड रिअॅलिटी मॅजिक मिररसमोर प्रवासी किंवा पर्यटक उभे राहिल्यास त्यांना आभासी जग अनुभवता येणार आहे.
( हेही वाचा: सीएसएमटीचे फलाट वाढता वाढता वाढे…)
एलईडी स्क्रीन बसवणार
करमणुकीसाठी दर महिन्याला यात बदल करण्यात येणार आहेत. यामध्ये जंगल सफारी, बर्फाळ प्रदेशात किंवा अन्य आभासी अनुभव घेण्याचा आनंद मिळेल, असे अधिका-याने सांगितले. याच्या आराखड्याला मंजुरीही मिळाली असून, त्यासाठी फलाट क्रमांक 11 आणि 12 येथे एक मोठी एलईडी स्क्रीन बसवण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community