मोठी बातमी: प्रसिद्ध अल्पवयीन युट्युबर गायब; पोलिसांकडून तपास सुरु

औरंगाबाद येथील एक प्रसिद्ध अल्पवयीन युट्यूबर शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन छावणी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर पोलिसांकडून मुलीचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे या अल्पवयीन मुलीचे नाव युट्युबर बिंदास काव्या असून तीचे युट्युबवर 4.32 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील प्रसिद्ध अल्पवयीन युट्युबर बिंदास काव्या शुक्रवारपासून गायब आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिचा अनेक ठिकाणी शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. त्यामुळे अखेर छावणी पोलिसांत याप्रकरणी मिसिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांकडून आता मुलीचा शोध सुरु आहे.

( हेही वाचा: ना दहिहंडीच्या शुभेच्छा, ना गणेशोत्सवाच्या; मोहित कंबोज यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र! )

आईची प्रतिक्रिया

याबाबत या मुलीच्या आईने एक 19 मिनिटांचा व्हिडीओ प्रसिद्ध केला असून, ज्यात आमची मुलगी कधीही एकटी राहत नाही. एवढा वेळ ती एकटी राहू शकत नाही. त्यामुळे तिला कुठेही पाहिले तर आम्हाला कळवा, असे आवाहन केले आहे. सोबतचा आम्हाला कुणीही मदत करत नसल्याचा आरोपही मुलीच्या आईने केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here