औरंगाबाद शहरातील लेबर कॉलनीवर प्रशासनाकडून सकाळी ६ वाजल्यापासून तोडक कारवाईला सुरुवात झाली आहे. गेल्या ३० वर्षाहून अधिक काळ याठिकाणी लोक वास्तव्यास होते. तोडक कारवाईमुळे परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. गेल्या ६ महिन्यांपासून अशलेल्या रहिवाशांचा विरोध लक्षात घेता मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या ठिकाणी ३३८ घरं पाडण्यात येणार आहेत. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ५०० पोलीस आणि १५० अधिकाऱ्यांचा बंदोबस्त असून या कारवाईसाठी ५० जेसीबीसह अनेक कामगारांना पाचारण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – आता आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौ-यालाही विरोध)
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले कारवाईचे आदेश
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील लेबर कॉलनी या ठिकाणी २० एकर सरकारी जागेवर १९५३ मध्ये शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने तयार करण्यात आली होती. १९५३ साली २० एकर भूखंडात प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी घरं बांधण्यात आली होती. या विरोधात स्थानिक रहिवाश्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या निकालानंतर अखेर सरकारकडून तब्बल ३३८ घरांवर जेसीबी चालवत ही घऱं जमीनदोस्त करण्याचे काम सुरू आहे. औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश देत जवळपास ३० जेसीबी या पाडकाम कारवाईसाठी पाठवले आहेत. या परिसरात ही कारवाई सुरू असताना कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी जमावबंदी (कलम 144 ) लागू करण्यात आली आहे. यासह बुधवारी दिवसभर या परिसराबाहेरील नागरिकांना या कारवाईदरम्यान येथे येण्यास मज्जाव करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
अश्रू झाले अनावर
मंगळवार सायंकाळपर्यंत लेबर कॉलनीतील ७० टक्के सदनिका रहिवाशांनी स्वत:हून रिक्त केल्या. यावेळी ही कॉलनी सोडताना अनेकांना अश्रू अनावर झाले. तीन पिढ्यांची नाळ शासन आणि प्रशासनाने तोडल्याची भावना सदनिकाधारकांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community