गेल्या काही वर्षांपूर्वी औरंगाबादचा कचरा प्रश्न देशभरात गाजला. या मुद्द्यावरुन औरंगाबादमध्ये दंगल झाली होती. आता पुन्हा एकदा औरंगाबादचा कच-याचा मुद्दा चर्चेत आला आहे. कारण औरंगाबादच्या पडेगाव येथील महापालिकेच्या कचरा प्रक्रिया केंद्रांवरील कच-याच्या ढिगा-याला शुक्रवारी रात्री आग लागली. तब्बल 36 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र, 48 तासांनंतरही धुराचे लोट सुरुच असून आग धुमसत आहे. त्यामुळे धुमसत्या कच-याच्या ढिगा-यावर पाण्याचा मारा केला जात आहे.
आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातारवण
पडेगाव येथे दररोज 150 मेट्रिक टन कच-यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरु आहे. इथे कच-याचा ढीग साचल्याने त्यात मिथेन वायू तयार झाला आहे. सध्या हिवाळा सुरु असून, सकाळी आणि संध्याकाळी वारा वाहत आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास कचराडेपोतील ढिगा-याला आग लागली. पाहता- पाहता आग वाढत गेली. आगीचे लोळ उठल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तातडीने अग्निशमन विभागाचे तीन बंब घटनास्थळी बोलावण्यात आले. अग्निशमनच्या तीन बंबांनी रात्रभर पाण्याचा मारा सुरु ठेवला. त्यासोबतच मनपाचे तीन टॅंकदेखील आणण्यात आले होते.
( हेही वाचा: 23 जानेवारी: जगातील सर्वात विनाशकारी भूकंप; अवघ्या काही सेकंदात गेला लाखोंचा जीव )
वाचन