Auto Debit चे नियम बदलले, RBI ने घेतला मोठा निर्णय!

109

RBI ने आवर्ती व्यवहारांची (ऑटो पेमेंट) मर्यादा सध्या ५ हजारांवरून १५ हजार रुपये केली आहे. विमा हप्ते, शैक्षणिक शुल्क पेमेंटसाठी ग्राहकांना सुविधा व्हावी म्हणून ई-मॅंडेट (e-mandate) व्यवहारांवर असलेली प्रती व्यवहार मर्यादा शिथिल करण्याचा निर्णय RBI ने घेतला आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

( हेही वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कसा निश्चित केला जातो? जाणून घ्या कसा होणार फायदा)

RBI ने 1 ऑक्टोबर 2021 पासून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI च्या मदतीने आवर्ती पेमेंटसाठी (ऑटो-डेबिट पेमेंट) OTP अनिवार्य केला होता. सध्या, 5 हजार रुपयांपर्यंतच्या पेमेंटसाठी OTP प्रमाणीकरण आवश्यकता नाही. या निर्णयानंतर आता ही मर्यादा 15 हजार करण्यात आली आहे. मात्र, यापेक्षा जास्त रक्कमेसाठी ओटीपी देणे बंधनकारक आहे.

40% पेक्षा जास्त पेमेंट अयशस्वी

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, आवर्ती पेमेंटची मर्यादा वाढवल्याने ग्राहक पेमेंट करू शकतील. हा निर्णय बँका आणि ग्राहक दोघांसाठी फायदेशीर आहे. यासह, त्यांनी सांगितले की जुन्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे 40% पेक्षा जास्त पेमेंट अयशस्वी होत होते. ओटीपीद्वारे प्रमाणीकरणानंतर 5 हजारांहून अधिक पेमेंट सेटअप करावे लागले. त्यामुळे त्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. दरम्यान तुमच्या Mutual fund, एसआयपी, विमा प्रिमियम आणि इतर आवर्ती पेमेंटवर नवीन नियमाचा कोणताही परिणाम होणार नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.