एका व्यक्तीने दिल्लीच्या पोलीस उपायुक्तांना टॅग केले आणि ट्विट केले की, एक ऑटो बंदूक आणि स्फोटके घेऊन प्रगती मैदानाकडे जात आहे. या ट्विटने दिल्ली बाह्य उत्तर जिल्हा पोलिसांमध्ये एकच घबराट पसरली. त्या व्यक्तीने ट्विटमध्ये ऑटो नंबर लिहिला होता. मात्र पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला असता गोष्ट वेगळीच निघाली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. (G-20 Summit)
(हेही वाचा – Varanasi Airport Threatened : दिल्लीत जी 20 परिषद सुरु असतानाच वाराणसी विमानतळावर बॉम्बस्फोट करण्याची धमकी)
कुलदीप शाह असे आरोपीचे नाव आहे. त्यांनी पोलीस उपायुक्त बाह्य उत्तर जिल्हा पोलिसांना ऑटोच्या नंबरसह टॅग केले आणि ट्विट केले की, गन आणि स्फोटके घेऊन ऑटोरिक्षा प्रगती मैदानाकडे जात आहे. प्रगती मैदानावर जागतिक स्तरावरील G20 शिखर परिषद सुरू असल्याने. या ट्विटनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. (G-20 Summit)
Taking swift action on bomb threat hoax in #G20Summit area, #DelhiPolice’s P.S. Bhalswa Dairy team traced the accused and arrested him for spreading false information in public. Legal action is being taken. @dcp_outernorth#DelhiPoliceUpdates pic.twitter.com/XpUK6cF6gA
— Delhi Police (@DelhiPolice) September 8, 2023
पोलिसांनी कारवाई करत ट्विटमध्ये ज्या ऑटोचा क्रमांक नमूद केला होता, त्याचा शोध घेतला. पोलिसांनी काही वेळातच ऑटो शोधून काढली आणि ऑटो मालकाच्या घरी पोहोचले. तेव्हा त्यांना ऑटोरिक्षा घरी उभी असल्याचे दिसले. पोलिसांना तपासात आढळले की, ऑटोरिक्षा चालक कपड्यांचा पुरवठा करत असल्याचे पोलिसांना समजले. वैयक्तिक वैमनस्यातून ऑटो मालकाला गोवण्याच्या उद्देशाने हे ट्विट जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. वाहन मालक आणि आरोपींमध्ये पार्किंगवरून वाद झाला होता, त्यामुळे आरोपीने संबंधित रिक्षाचालकाला त्रास देण्याच्या उद्देशाने हे ट्विट केले आहे. वैयक्तिक शत्रुत्वामुळे आरोपी कुलदीपने दिल्ली पोलिसांना चुकीची माहिती पाठवली, असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. ‘त्याने G20 शी संबंधित चुकीची माहिती दिली आहे. त्यामुळे आरोपी कुलदीपवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे’, असे पोलिसांनी सांगितले. (G-20 Summit)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community