मुंबईकरांनो! आता तुमच्या खिशाला लागणार कात्री, कारण…

143

तुम्ही मुंबईकर आहात तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण आता मुंबईत प्रवास करणं अधिक खर्चिक होणार आहे. मुंबईत टॅक्सी आणि रिक्षातून प्रवास करणे आता महागणार असल्याने मुंबईकर प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत टॅक्सी, रिक्षा भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईत पेट्रोल-डिझेलसह सीएनजी महाग झाल्याने रिक्षा 2 रुपये तर टॅक्सीची 3 रुपयांची भाडेवाढीची शक्यता आहे. यामुळे रिक्षाचे भाडे 21 वरुन 23 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. तर टॅक्सीचे भाडे 25 रुपये होते. आता ते 28 रुपये होणार असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – लेजेंडरी Deccan Queen ला 92 तर Punjab Mail एक्स्प्रेसला 110 वर्षे पूर्ण!)

मुंबईतील रिक्षा युनियनने दिलेल्या इशाऱ्यानुसार, ऑटो रिक्षाचे भाडे लवकरच वाढू शकते, इंधनाच्या दरात झालेल्या वाढीनंतर हा इशारा देण्यात आला होता. सीएनजीच्या किमतीत नुकत्याच झालेल्या वाढीमुळे, आमच्या परिचालन खर्चात प्रति किमी 1. 31 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या रिक्षाचे किमान भाडे 21 रुपये असून पहिल्या 1.5 किमीनंतर सध्या 14.20 रुपये प्रति किमी भाडे आहे, असे रिक्षा युनियनकडून सांगितले जात आहे.

सरकारने टॅक्सी आणि रिक्षाचालकांना सवलतीच्या दरात सीएनजी उपलब्ध करुन द्यावा. भाडे वाढवणे हा योग्य उपाय नाही कारण त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होईल, असे मुंबई शहरातील एका प्रमुख ऑटो युनियनचे नेते शशांक राव यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ऑटो रिक्षा आणि टॅक्सी यांच्या भाड्यात लवरकर वाढ होणार असल्याचे सांगितले जात असून या महिन्यात मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाची एक बैठक होणार आहे. यामध्ये हा भाडेवाढीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र भाडेवाढ नेमकी किती करण्यात आली, हे या बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.