Avinash Dharmadhikari यांच्यामुळे भारत विकास परिषदेच्या विलेपार्ले शाखेचा नावलौकिक वाढला

सेवानिवृत्त झाल्यानंतर आठ दिवसाच्या आत मध्येच त्यांनी 8 एप्रिल 2023 रोजी भारत विकास परिषद विलेपार्ले शाखेचा कार्यभार स्वीकारला. 

199
भारत विकास परिषद ही अराजकीय सामाजिक संस्था आहे. ही संस्था 1961 मध्ये स्थापन झाली आणि आज या संस्थेच्या 1600 पेक्षा जास्त शाखा संपूर्ण भारतामध्ये आहेत. त्यापैकी विलेपार्ले ही एक शाखा आहे आणि त्या शाखेचे अध्यक्ष म्हणून अविनाश धर्माधिकारी (Avinash Dharmadhikari) कार्यरत आहेत. ही संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित आहे. अविनाश धर्माधिकारी हे 35 वर्ष पोलीस खात्यामध्ये सेवा करून दिनांक 31 मार्च 2023 रोजी रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावरून सेवानिवृत्त झाले.
bharat
सेवानिवृत्त झाल्यानंतर आठ दिवसांमध्येच त्यांनी 8 एप्रिल 2023 रोजी भारत विकास परिषद विलेपार्ले शाखेचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी कार्यभार स्वीकारला तेव्हा भारत विकास परिषद विलेपार्ले शाखेचे केवळ 40 सदस्य होते आणि शाखा जास्त सक्रिय नव्हती. त्यांनी आपल्या संपर्काचा उपयोग करून थोड्याच अवधीमध्ये विविध उपक्रम हाती घेतले आणि त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती होऊन लोक भारत विकास परिषद विलेपार्ले शाखा चे सदस्य होऊ लागले. काही महिन्यातच त्यांनी सदस्य संख्या 150 पेक्षा जास्त वाढवली आणि आता तर 250 पेक्षा जास्त सदस्य झालेले आहेत. (Avinash Dharmadhikari)
त्यांच्या या कर्तृत्वामुळे भारत विकास परिषद विलेपार्ले शाखा ही शाखा मागील वर्षी संपूर्ण पश्चिम क्षेत्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र गोवा आणि गुजरात या विभागातून सर्वोत्कृष्ट शाखा म्हणून निवडण्यात आली होती. यावर्षी देखील विलेपार्ले शाखेने भारत विकास परिषद मुंबई प्रांतमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि त्यानिमित्त त्यांना बक्षीस प्रदान करण्यात आले आहे. भारत विकास परिषद विलेपार्ले शाखामध्ये अविनाश धर्माधिकारी (Avinash Dharmadhikari) हे अध्यक्ष आहेत, प्रशांत गंगवाल हे कोषाध्यक्ष आहेत, संदीप पारिक हे सचिव आहेत तर ललित छेडा हे सहसचिव आहेत. या टीमने गेल्या दोन वर्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून शाखेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.